
अभिनेता अरबाज खान एकेकाळी मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीला डेट करत होता. जॉर्जिया तिच्या हॉट लूकमुळे नेहमी चर्चेत असते. तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामधील तिच्या ट्रान्सफॉर्मेशनने सर्वांनाच धक्का बसला आहे.

जॉर्जिया नुकतीच तिच्या बहिणीसोबत डिनरला गेली होती. यावेळी काही पापाराझींनी तिचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक केले. हे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

जॉर्जियाने यावेळी काळसर राखाडी रंगाचा स्केटर स्कर्ट आणि त्यावर काळा कॉर्सेट टॉप परिधान केला होता. परंतु तिच्या बदललेल्या चेहऱ्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. जॉर्जियाचा चेहरा अचानक इतका कसा बदलला, असा सवाल नेटकऱ्यांना पडला आहे.

'हिनेसुद्धा कॉस्मेटिक सर्जरी केली का', असा प्रश्न एकाने विचारला आहे. तर 'नैसर्गिक सौंदर्याची वाट लावली' असं दुसऱ्याने म्हटलंय. जॉर्जियाने लिप फिलर्स आणि आयब्रो टॅटू केल्याचा अंदाज काहींनी वर्तवला आहे. तर तिने बोटॉक्स करून चेहरा बदलल्याचंही काहींनी म्हटलं आहे.

मलायका अरोराला घटस्फोट दिल्यानंतर अरबाज खान हा जॉर्जिया अँड्रियानीला डेट करत होता. हे दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. परंतु काही वर्षांपूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर अरबाजने मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी लग्न केलं.