
अभिनेत्री मलायका अरोराला घटस्फोट दिल्यानंतर अरबाज खानने डिसेंबर 2023 मध्ये सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी दुसरं लग्न केलं.

अरबाजने शुरासोबत आयुष्याची एक नवी सुरुवात केली असून हे दोघं त्यांच्या आयुष्यात खूप खुश असल्याचं पहायला मिळत आहे. आता लग्नाच्या दीड वर्षानंतर शुराने गुड न्यूज दिली आहे. खान कुटुंबात लवकरच चिमुकला पाहुणा येणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून शुरा खान प्रेग्नंट असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. परंतु त्यावर दोघांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. आता शुराने गरोदर असल्याचा थेट पुरावाच दिला आहे.

मंगळवारी शुराला मुंबईतील एका शॉपबाहेर पाहिलं गेलं. यावेळी तिने गडद निळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस आणि त्यावर डेनिम जॅकेट घातला होता. या ड्रेसमध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट पहायला मिळाला.

यावेळी शुरा अत्यंत काळजीपूर्वक चालताना दिसली. या गुड न्यूजबद्दल अद्याप अरबाज खानने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. अरबाजने 1998 मध्ये मलायकाशी लग्न केलं होतं. या दोघांना अरहान हा मुलगा आहे.