
अरबाज खान याने काही दिवसांपूर्वीच शूरा खान हिच्यासोबत दुसरे लग्न केले. 2017 मध्ये अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा घटस्फोट झाला.

मलायका अरोरा हिच्यासोबतच्या घटस्फोटानंतर अरबाज खान याने काही वर्षे जॉर्जिया एंड्रियानी हिला डेट केले. मात्र, अनेक वर्षे रिलेशनमध्ये राहिल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले.

अरबाज खान आणि शूरा खान यांच्या लग्नानंतर जॉर्जिया एंड्रियानी ही चांगलीच चर्चेत आल्याचे बघायला मिळाले. आता नुकताच जॉर्जिया एंड्रियानीने मोठा खुलासा केलाय.

जॉर्जिया एंड्रियानी ही बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सातत्याने सुरू होती. अरबाजच्या लग्नानंतर ती मोठे खुलासे करणार असल्याचे सांगितले जात होते.

आता जॉर्जिया एंड्रियानी हिच्याकडून स्पष्ट करण्यात आले की, ती बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी होणार नाहीये. जॉर्जिया एंड्रियानीने म्हटले की, मीच माझी बॉस आहे.