
वैदिक ज्योतिषात अर्धकेंद्र योगाची निर्मिती ही एक शक्तिशाली आणि दुर्मीळ संयोग असतो. हा योग दोन ग्रह एकमेकांपासून ४५ डिग्री अंतरावर असताना तयार होतो. आता २८ जानेवारी २०२६, बुधवारच्या दिवशी शनि आणि बुध ग्रहांमध्ये हा योग तयार होत आहे. या योगाच्या निर्मितीमुळे राशींच्या जीवनावर त्याचा परिणाम होईल. अर्धकेंद्र योग तयार होत असताना अनेक राशींना भाग्याचा साथ मिळेल. अर्धकेंद्र योग तयार होताना शनी मीन राशीत आणि बुध मकर राशीत विराजमान होणार आहे. चला, या योगामुळे कोणत्या राशींना लाभ होईल ते जाणून घेऊया.

मीन राशीच्या ९व्या भावात बुध आणि लग्न भावात शनी गोचर करेल. ग्रहांच्या या स्थितीमुळे भाग्याचा साथ मिळेल. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना लाभ मिळेल. तुमचे अडकलेले काम पूर्ण होतील आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यांमध्ये रुची वाढू शकते.

सिंह राशीच्या लोकांना संघर्षावर विजय मिळेल. बुध तुमच्या ८व्या आणि शनि सहाव्या भावात गोचर करतील. शत्रूंवर विजय मिळवता येईल. बुध ग्रहाच्या प्रभावाने अचानक लाभ मिळू शकतो. तुमची तब्येत सुधारेल.

वृषभ राशीच्या लोकांना या योगाच्या निर्मितीमुळे शुभ फळ मिळतील. बुध ग्रह वृषभ राशीच्या ९व्या भावात आणि शनी तिसऱ्या भावात असतील. शनी साहस वाढवतील. बुध ग्रहाच्या प्रभावाने भाग्याचा साथ मिळेल. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुम्हाला यश मिळेल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)