PHOTO | धमाकेदार कामगिरीनंतरही IPL 2021 मध्ये अनसोल्ड, आता थेट इंग्लंड दौऱ्यासाठी निवड

| Updated on: May 08, 2021 | 5:56 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची (Team India) शनिवारी घोषणा करण्यात आली. यामध्ये अर्जन नागवासवालाची (Arzan Nagwaswalla) राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.

1 / 5
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि इंग्लंड दौऱ्यासाठी शुक्रवारी टीम इंडियाची निवड करण्यात आली. मुख्य 20 खेळाडूंसह 4 राखीव अशा एकूण 24 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. यामध्ये अर्जन नागवासवालाचा समावेश आहे. अर्जन फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये गुजरातचे प्रतिनिधित्व करतो. अर्जनने आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या लिलावसाठी अर्ज केला होता. अर्जनची बेस प्राईज 20 लाख होती. मात्र त्यानंतरही अर्जन दुर्देवाने अनसोल्ड राहिला. अर्जनने आयपीएलच्या आधी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील 5 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच विजय हजारे स्पर्धेतील 7 सामन्यात 19 विकेट्स घेतल्या. त्याने शानदार गोलंदाजीच्या जोरावर सेमी फायनलपर्यंत आपल्या संघाला पोहचवलं होतं.

2 / 5
23 वर्षीय अर्जनने टीममध्ये स्थान मिळवत इतिहास रचला आहे. अर्जन टीम इंडियामध्ये फारुख इंजीनियर यांच्यानंतर 28 वर्षांच्या कालावधीनंतर धडक मारणारा पारशी खेळाडू ठरला आहे. इंजीनियर यांनी टीम इंडियाकडून 1975 मध्ये पहिला सामना खेळला होता. तर अखेरची मॅच 1993 मध्ये खेळले होते.

3 / 5
अर्जनने 2019-20 मोसमात 8 सामन्यात 41 विकेट्स पटकावल्या होत्या. गुजरातला सेमी फायनलपर्यंत पोहचवण्यात अर्जूनने मोठी भूमिका बजावली होती.  त्याने आतापर्यंत 16 फर्स्ट क्लास सामन्यात 62 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच लिस्ट ए सामन्यांमध्ये 20 मॅचमध्ये 39 फलंदाजांना मैदानाबाहेरची वाट दाखवली आहे.

4 / 5
अर्जनने 2018 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. बडोदा विरुद्ध त्याने हा पहिला सामना खेळला होता. पहिल्या सामन्यात त्याला 1 विकेट मिळाली होती. मात्र त्याने दुसऱ्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. मुंबई विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने एकाच डावात 5 विकेट्स घेतल्या. अर्जनने मुंबईला त्यांच्याच होम ग्राऊंड म्हणजेच वानखेडे स्टेडियममध्ये पाणी पाजलं होतं. त्याने सूर्यकुमार यादव, अरमान जाफर, आदित्य तरे, ध्रूमिल मातकर आणि सिद्धेश  लाड या 5 फलंदाजाना माघारी धाडलं होतं.

5 / 5
अर्जनचा जन्म 17 ऑक्टोबर 1997 मध्ये नरगालमधील उंबरगाव येथे झाला. उंबरगाव महाराष्ट्र-गुजराजच्या सीमेवर आहे. अर्जन जुबीन भारूचानंतर रणजी खेळणारा पहिला पारसी क्रिकेटपटू ठरला होता. जुबीन यांनी 1992 ते 1995 या दरम्यान मुंबईचं प्रतिनिधित्व केलं होतं.