आशा भोसलेंच्या या गाण्यातील शब्दामुळे निर्माण झालेला मोठा गैरसमज; स्पष्टीकरणासाठी आशा भोसलेंना रेडिओवर यावे लागले

आशा भोसले यांचं 35 वर्षांपूर्वीचं गाणं, ज्याच्या सुरुवातीच्या शब्दामुळे झालेला प्रेक्षकांचा मोठा गैरसमज. वाद प्रचंड वाढल्यानंतर आशा भोसले यांनी रेडिओवर येऊन दिलं होतं स्पष्टीकरण.

| Updated on: Jun 25, 2026 | 1:34 PM
1 / 5
आजच्या काळात गाणी किंवा चित्रपटांमधील डबल मीनिंग संवाद आणि गाण्यांवरून अनेकदा चर्चा रंगताना दिसते. मात्र 1991 साली प्रदर्शित झालेल्या एका हिंदी चित्रपटातील गाण्याबाबत असा वाद निर्माण झाला होता, जो प्रत्यक्षात गैरसमजामुळे उद्भवला होता.

आजच्या काळात गाणी किंवा चित्रपटांमधील डबल मीनिंग संवाद आणि गाण्यांवरून अनेकदा चर्चा रंगताना दिसते. मात्र 1991 साली प्रदर्शित झालेल्या एका हिंदी चित्रपटातील गाण्याबाबत असा वाद निर्माण झाला होता, जो प्रत्यक्षात गैरसमजामुळे उद्भवला होता.

2 / 5

या वादाची चर्चा इतकी वाढली की प्रसिद्ध गायिका आशा भोसले आणि गीतकार-दिग्दर्शक गुलजार यांना स्वतः रेडिओवर येऊन या गाण्याचा अर्थ स्पष्ट करावा लागला होता.

3 / 5

हा प्रसंग 'लेकीन' या चित्रपटातील ‘झूठे नैना बोले सांची बतियां’ या गाण्याशी संबंधित आहे. गाणे आशा भोसले यांनी गायले होते आणि ते हेमा मालिनी यांच्यावर चित्रित करण्यात आले होते.

4 / 5

गाण्याच्या सुरुवातीच्या ओळीतील ‘झूठे नैना’ या शब्दप्रयोगाचा अनेकांनी चुकीचा अर्थ लावला. कथानकाच्या संदर्भात हा शब्द ‘खोटे’ किंवा ‘फसवे’ असा समजण्यात आला आणि गाण्याच्या आशयावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. त्यामुळे या गाण्यावर विविध चर्चा आणि वाद निर्माण झाले.

5 / 5

वाद वाढल्यानंतर गुलजार आणि आशा भोसले यांनी स्पष्ट केले की, गाण्यातील शब्द ‘झूठे’ नसून ‘जूठे’ आहे. हिंदी भाषेत ‘जूठा’ म्हणजे एखाद्याने वापरलेले किंवा खाल्लेले. त्यामुळे गाण्याचा अर्थ लोकांनी समजून घेतलेल्या अर्थापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. या एका शब्दामुळे झालेल्या गैरसमजाने त्या काळात मोठी चर्चा रंगली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us