‘व्ह्यू वन्स’ म्हणून नको ते Video आले, पळत पोलीस मित्राकडे गेला; रिकव्हर होताच अधिकाऱ्यांची झोप उडाली

लिंगपिसाट अशोक खरातला सुरुवातीला काही लोकांनी त्याचे नको ते व्हिडीओ पाठवले होते. हे व्हिडीओ ‘व्ह्यू वन्स’ म्हणून पाठवले होते. ते व्हिडीओ पुन्हा मिळावेत म्हणून खरात पोलीस अधिकाऱ्याकडे गेला. जेव्हा अधिकाऱ्याने हे व्हिडीओ पाहिले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.

| Updated on: Mar 24, 2026 | 5:29 PM
1 / 7
नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याच्या लैंगिक शोषणाच्या काळ्या कृत्यांची एकेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. खरातने स्वतः खंडणीची तक्रार दाखल केली होती. मात्र, या तक्रारीच्या तपासातच त्याच्या मुसक्या आवळल्या गेल्या. त्याला ब्लॅकमेल करण्यासाठी पाठवलेल्या ‘व्ह्यू वन्स’ व्हिडीओ क्लिप्समुळे त्याचे सर्व गुपित कांड उघडकीस आले.

2 / 7
सूत्रांच्या माहितीनुसार, खरातचे महिलांसोबतचे अत्यंत आक्षेपार्ह व्हिडीओ काही जणांच्या हाती लागले होते. त्यांनी हे व्हिडीओ खरातला व्हॉट्सॲपवर ‘View Once’ (फक्त एकदाच पाहता येणारा) मोडवर पाठवले. खरातने घाईघाईने काही क्लिप्स पाहिल्या, पण त्या पुन्हा उघडता आल्या नाहीत. क्लिप्स सेव्ह किंवा पुन्हा पाहण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरावे हे न सुचल्याने खरातची चांगलीच गोची झाली.

3 / 7
आपल्या पाठीशी मोठे राजकीय नेते आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याच्या भ्रमात असलेल्या खरातने हा विषय शांततेत मिटवण्याऐवजी समोरच्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. तो थेट नाशिकमधील एका अत्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे गेला. हा अधिकारी खरातचा कट्टर भक्त होता. खरातने या अधिकाऱ्याकडे त्या व्यक्तीने खंडणी मागितल्याची तक्रार केली. अधिकाऱ्याने शहानिशा न करता खरातचा मोबाईल आपल्या विश्वासू टीमकडे पाठवला आणि त्यातील ‘डेटा रिकव्हर’ करण्याचे आदेश दिले.

4 / 7
मोबाईलमधील क्लिप्स उघडण्यासाठी पोलिसांनी सायबर सेलच्या तंत्रज्ञानाचा वापर केला. जेव्हा क्लिप्स उघडल्या गेल्या, तेव्हा स्क्रीनवर उमटलेल्या दृश्यांनी अनुभवी पोलिस अधिकारीही हादरले. दृश्य इतके किळसवाणे आणि भयानक होते की, कनिष्ठ कर्मचाऱ्यांना आपल्या ‘साहेबांना’ (खरातचे भक्त असलेल्या अधिकाऱ्यांना) हे कसे सांगावे, याची चिंता लागली. अखेर एका कर्मचाऱ्याने छातीवर दगड ठेवून साहेबांना सर्व क्लिप्स दाखवल्या. हे दृश्य पाहून खरातचा ‘भक्त’ अधिकारीही स्तब्ध झाला.

5 / 7
खरं तर, त्या क्षणीच खरातवर कारवाई व्हायला हवी होती. मात्र, बदनामी टाळण्यासाठी ‘सामंजस्याने’ मार्ग काढण्याचा सल्ला या अधिकाऱ्याने दिल्याचे बोलले जाते. त्यानुसार, क्लिप पाठवणाऱ्या दोघांविरुद्ध खंडणीची तक्रार दाखल करण्यात आली.

6 / 7
पण हीच तक्रार खरातसाठी घातक ठरली. तक्रारीच्या तपासात पोलिसांना खरातचे लैंगिक शोषणाचे खरे स्वरूप समोर आले. अखेर खंडणी तक्रार करणारा खरातच लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आला.

7 / 7
‘व्ह्यू वन्स’ने सुरू झालेल्या या प्रकरणाने भोंदूबाबा अशोक खरातची झोप उडवली आणि त्याच्या वर्षानुवर्षांच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us