दिवसरात्र महिलांची फसवणूक करणाऱ्या खरातचे रंगच बदलले! तुरुंगात जे काही करतोय ते वाचून चकितच व्हाल

Ashok Kharat : महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अशोक खरातला पहिल्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्याची तपास यंत्रणांकडून कसून चौकशी केली जात आहे. अशातच आता खरातचा कोठडीतील दिनक्रम समोर आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बापू गायकवाड | Updated on: Apr 01, 2026 | 7:23 PM
1 / 5
अशोक खरात दररोज सकाळी नाष्टा न करता 8 ते 9 या वेळेत जेवण करतो. चहा, कॉफी असं कोणतंही पेय तो दिवसभर घेत नाही, तो केवळ पाणी पितो.

अशोक खरात दररोज सकाळी नाष्टा न करता 8 ते 9 या वेळेत जेवण करतो. चहा, कॉफी असं कोणतंही पेय तो दिवसभर घेत नाही, तो केवळ पाणी पितो.

2 / 5

अशोक खरात रात्रीचे जेवण न करता दुपारीच 4 ते 5 या वेळेत जेवण करतो. जेवण करताना तो कुणाशी बोलत नाही, तो पूर्णपणे शांत असतो.

3 / 5

संध्याकाळी झोपण्यापूर्वी तो तब्बल 1 तास नामस्मरण करतो. गायत्री मंत्र, विष्णू मंत्र, सूर्य मंत्र या सह अन्य मंत्रांचं पठण करून पूर्ण मनशांती करूनच झोपतो. या सगळ्या मंत्रांचा अर्थही त्याला तोंडपाठ आहे.

4 / 5

अशोक खरात याला तब्बल 8 भाषा येतात, तो मराठी, हिंदी, इंग्रजी, बंगाली, मल्याळम, मणिपुरी (मैतेई), तमिळ, तेलगू या भाषा बोलू शकतो. तसेच त्याला या भाषा वाचता देखील येतात.

5 / 5

दरम्यान, अशोक खरातवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तसेच अनेक राजकारणीही त्याच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता तपास यंत्रणा त्याची कसून चौकशी करताना पहायला मिळत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us