
आशिया कप 2023 मध्ये बांगलादेश संघाने भारताचा पराभव करत आशिया कपमधील शेवटच्या सामन्यात विजयी समारोप घेतला.

संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावणाऱ्या भारताला बांगलादेशच्या संघाने पराभूत केलं. या सामन्यामध्ये शतकवीर शुभमन गिल याचं झुंजार शतक व्यर्थ गेलं. शुभमन गिल याने 121 धावा केल्या होत्या मात्र सामन्याच्या शेवटला तो बाद झाला आणि भारताची तारांबळ उडाली.

शुभमन गिल याने सुरुवातीपासूनच एक बाजू लावून धरली होती. मात्र दुसऱ्या बाजूने भारताच्या विकेट जात होत्या. मोठी भागीदारी झाली नाही. त्याचाच फटका भारतीय संघाला बसला. मात्र सिक्सर किंग युवराज सिंह याने शुबमनलाच झापलं आहे.

युवराज सिंह याने गिलच्या पोस्टवर कमेंट करत, तू आजचा सामना सहज जिंकून देऊ शकत होता. मात्र चुकीच्या शॉटमुळे तू आऊट झाला असं युवराज म्हणाला.

शुभमन गिल आता रविवारी होणाऱ्या श्रीलंका भारत फायनल सामन्यांमध्ये कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. आशिया कप मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीमध्ये तो पहिल्या क्रमांकावर आहे.