
अभिनेत्री प्रियांका चोप्रा पती निक जोनससोबत पालकत्वाचा आनंद घेत आहे. जानेवारीमध्ये सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपण आई झाल्याची माहिती दिली होती. 15 जानेवारी रोजी सॅन डिएगो रुग्णालयात सरोगसीद्वारे त्यांच्या मुलीचा जन्म झाला होता. आता तीन महिन्यानंतर त्यांनी आपल्या मुलीचे नाव नामकरण केल्याची माहिती काही मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे.

प्रियांका चोप्राचा संस्कृतीवरही विश्वास आहे. त्यामुळे प्रियांकाला आपल्या मुलीचे नाव दोघांशी जोडून ठेवणारे ठेवायचे होते. प्रियांकाला तिच्या मुलीच्या नावाची खूप दिवसांपासून काळजी होती. आपल्या मुलीचे नाव काहीतरी अर्थपूर्ण आणि वेगळे असावे अशी तिची इच्छा होती.

एका रिपोर्टनुसार, मुलीचे नाव 'मालती मेरी चोप्रा जोनस' आहे. अहवालात जन्म प्रमाणपत्राचा हवाला देण्यात आला आहे. मालती' हे नाव संस्कृतमधून आले आहे. याचा अर्थ- 'छोटे सुगंधित फूल.' त्याच वेळी, मेरी लॅटिन भाषेतील स्टेला मॅरिस या शब्दापासून बनलेली आहे, ज्याचा अर्थ समुद्रातील तारा आहे. याबरोबरच मेरी हे येशूच्या आईचे नाव होते

प्रियांका आणि निक जोनास यांनी 22 जानेवारी रोजी इंस्टाग्रामवर घोषणा करून पालक बनल्याची माहिती दिली होती. त्यांनी पोस्ट मध्ये लिहिले होते की 'आम्ही हे सांगताना खूप आनंदी आहोत की आम्ही सरोगसीद्वारे आईवडील झाले आहोत .