AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल, पेट्रोलियम उत्पादने, घरगुती गॅस सिलेंडर नेणारी वाहने अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित; देशात महाराष्ट्रातील या जिल्ह्यात आदेश लागू

आखाती देशांमध्ये पेटलेल्या युद्धाची झळ महाराष्ट्राला लागण्यास सुरुवात झाली आहे. अनेक जिल्ह्यात नवीन आदेश लागू करण्यात आलेत.. पेट्रोल, पेट्रोलियम उत्पादने, घरगुती गॅस सिलेंडर नेणारी वाहने अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

पेट्रोल, पेट्रोलियम उत्पादने, घरगुती गॅस सिलेंडर नेणारी वाहने अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित; देशात महाराष्ट्रातील या जिल्ह्यात आदेश लागू
| Updated on: Mar 11, 2026 | 12:08 PM
Share

इरण, इस्त्रायल आणि अनेरिका यांच्यात पेटलेल्या वणव्याच्या झळा आता भारताला देखील लागू लागल्या आहेत. दिवसागणिक परिस्थिती अधिक चिघळत आहे आणि यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराची साखळी विस्कळीत झाली आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी गॅस, पेट्रोल व इतर पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

सिंधुदुर्ग येथे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) 2023 मधील कलम 163 अन्वये जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी महत्त्वाचे आदेश लागू केले आहेत. पेट्रोल, पेट्रोलियम उत्पादने तसेच घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वाहून नेणारी वाहने ही अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील सर्व महामार्ग, मुख्य रस्ते तसेच अंतर्गत रस्त्यांवरून या वाहनांना मुक्त संचाराचा अधिकार देण्यात आला आहे.

इंधनपुरवठा करणाऱ्या वाहनांना आवश्यकतेनुसार पोलीस संरक्षण पुरवण्याबाबत पोलीस अधीक्षकांनी कार्यवाही करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. रत्नागिरी येथे देखील मोठे बदल करण्यात आले आहेत.

रत्नागिरी येथे LPG गॅस व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध लादण्यात आहे आहेत. अत्यावश्यक सेवेत गॅस लागणाऱ्यांना आता एक अर्ज द्यावा लागणार आहे. हॉस्पिटल, वसतिगृह, शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या संस्था, वेदपाठ शाळा, शिक्षण संस्था, संरक्षण क्षेत्राचा समावेश यात आहे. त्यांना देखील अर्ज द्यावा लागणार आहे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अर्जामध्ये महिन्याला व्यवसायिक सिलेंडर किती लागतात याचं गणित मांडण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार गॅस एजन्सींना निम्मे सिलेंडर देण्याची मुभा देण्यात आली आहे. तर अमरावती जिल्ह्यातही गॅस सिलिंडरच्या ऑनलाईन बुकिंगमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. ऑनलाईन बुकिंग करताना अनेकांना क्रमांक उपलब्ध नसल्याचा संदेश येत आहे.

एक सिलिंडर घेतल्यानंतर 25 दिवसांपर्यंत दुसरे बुकिंग होत नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. ऑनलाईन बुकिंग करताना अनेकांना क्रमांक उपलब्ध नसल्याचा संदेश येत आहे. यामुळे अनेक ग्राहक थेट गॅस एजन्सीवर जाऊन सिलिंडर घेत असल्याचं समोर आलं आहेत. यामुळे अनेक ठिकाणी गॅस एजन्सीवर गर्दी झाल्याचं दिसून येत आहे.

Follow Us
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.