AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणालाच वाटलं नव्हतं अशी वेळ येईल… गॅसवर स्वयंपाक बनवणाऱ्यांची धाव लाकडं आणि कोळश्याकडे; मुंबईच्या वेशीवरच संकट

इराण-इस्रायल युद्धामुळे महाराष्ट्रात गंभीर ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. मध्य पूर्वेतील पुरवठा थांबल्याने एलपीजी गॅसची टंचाई जाणवत असून मुंबई, पुणे, सोलापूरसारख्या शहरांतील नागरिक आणि व्यावसायिकांना फटका बसला आहे. जळाऊ लाकूड आणि कोळशाची मागणी वाढली आहे, तर सोलापूरमध्ये गॅससाठी रांगा लागल्या आहेत. युद्धाचे दूरगामी परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होत आहेत.

कुणालाच वाटलं नव्हतं अशी वेळ येईल... गॅसवर स्वयंपाक बनवणाऱ्यांची धाव लाकडं आणि कोळश्याकडे; मुंबईच्या वेशीवरच संकट
firewood demandImage Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Mar 11, 2026 | 11:52 AM
Share

इराणवर इस्रायल-अमेरिकेकडून हल्ला चढवण्यात आल्यावर मोठ्या युद्धाला तोंड फुटलं आणि जगाता हाहाकार माजला. 12 दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या युद्धाचे परिणाम संपूर्ण जगावर, भारतातही दिसत असून महाराष्ट्रालाही या युद्धाची झळ सोसावी लागत आहे. मध्यपूर्वेतून होणारा उर्जा पुरवठा थांबला आहे, एलपीजी गॅस पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झाले. राज्यातील अनेक भागांत गॅसची टंचाई जाणवत आहे. मुंबईस पुमे,नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या महानगरांमध्ये नागरिक, हॉटेल व्यावसायिक, मेस चालक अशा अनेकांना मोठा फटका बसला आहे.

युद्धजन्य परिस्थितीमुळे lpg गॅस सिलेंडरच्या वितरणावरती निर्बंध आले असल्याने आता जळाऊ लाकडांना मागणी वाढली आहे. रत्नागिरी शहरातील विविध सॉ मिल मध्ये जळाऊ लाकडांची मागणी वाढल्याचे चित्र दिसत आहे. सध्या सॉ मिल मधील जळाऊ लाकडांचा दर प्रति किलो चार रुपये इतका आहे तर भुसा तीन रुपये किलो आहे. बेकरी आणि हॉटेल व्यवसायिकांकडून जळाऊ लाकडांची विचारणा होऊ लागली असून त्यामुळे आता जळाऊ लाकडांचा दर वाढण्याची शक्यता आहे. तसेच सॉ मिल मधल्या जळाऊ लाकडांसाठी काही कंपन्यांनी देखील मागणी केली आहे.

ठाण्यात कोळशाची मागणी

युद्धाचा फटका गॅस सिलेंडरना बसत असतानाच आता अनेकांनी कोळशाकडे धाव घेतली असल्याने कोळशाची मोठी मागणी दिसून येत आहे. सध्या कोळशाचे भाव चाळीस रुपये किलो असून मोठ्या प्रमाणात कोळसा विकत घेतला जात आहे. अनेक हॉटेल आणि धाब्यांसाठी कोळशांचा वापर केला जातो, त्यामुळे येणाऱ्या काळात अनेक लोक कोळशाचा पर्याय निवडू लागल्याचे दिसून येईल.

सोलापुरात घरगुती गॅस घेण्यासाठी लोकांच्या रांगा

सोलापुरातील रामवाडी परिसरातील गॅस गोडाऊनवर गॅस घेण्यासाठी लोकांची भली मोठी रांग लागली आहे. इराण-इस्त्राईल युद्धच्या पार्श्वभूमीवर गॅस तुटवड्याची भीती लोकांच्या मनात आहे. यापुढे गॅस मिळेल की नाही या भीतीने गॅस आत्ताच घेऊन साठवून ठेवण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र अचानक वाढलेल्या बुकिंगमुळे गॅस कंपनीच्या ऑनलाईन बुकिंग पद्धतीत तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे नागरिक स्वतःच गॅस घेऊन एजन्सीमध्ये येत आहे.

आम्ही चार दिवसापूर्वी बुकिंग केले होते त्यानंतर आज आमचा नंबर आलाय. काही लोकांना ऑनलाईन बुकिंग नसल्याने घरी पाठवले जात आहे. आम्ही दोन तासांपासून रांगेत थांबलोय अजून नंबर आला नाही, असं काही नागरिकांनी सांगितलं. ऑनलाईन बुकिंग केले तरी ते होत नाही, त्यामुळे आम्ही गॅस टाकी घेऊन इथे आलोय.

मात्र गॅस टाक्या उपलब्ध आहेत त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन आम्ही त्यांना करतोय. पण मात्र नागरिक गॅस टाक्या घेऊन थेट ऑफिसमध्ये येत आहेत, असं तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितलंय.

Follow Us
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.