राज्यात कुठेही वंचित समाजावर अन्याय झाला तिथे मनोज संसारे धावून जात – जयंत पाटील

एक विचार, एक भूमिका, आणि चळवळीशी असलेली आतुट बांधिलकी मी त्यांच्यात पाहिलीय. मनोज भाई आज जगात नसले तरी त्यांनी दिलेला विचार चळवळीला नव संजीवनी देणारा ठरेल.

महेश घोलप | Updated on: May 22, 2023 | 1:51 PM
1 / 5
वडाळा येथे पँथर स्व. मनोज भाई संसारे यांच्या शोकसभेस उपस्थित राहून जयंत पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली

वडाळा येथे पँथर स्व. मनोज भाई संसारे यांच्या शोकसभेस उपस्थित राहून जयंत पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली

2 / 5

मनोज भाई यांच्या निधनाने एक स्वाभिमानी नेता, दिलदार दोस्त, सर्वसामान्यांचा आवाज काळाच्या पडद्याआड गेल्याचं त्यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी सांगितलं.

3 / 5

राज्यात कुठेही वंचित समाजावर अन्याय झाला तिथे मनोज संसारे धावून जात. त्या पीडित कुटुंबांच्या मागे खंबीरपणे उभे राहत. मनोज भाई संसारे यांनी आयुष्यभर त्यांचे गुरु भाई संगारे यांची तत्वे जपली.

4 / 5

स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सुरू केलेली स्वाभिमानी चळवळ राज्यभर घराघरात त्यांनी पोहचवली. एकेकाळी BEST मध्ये सुमारे साडेतीन हजार तरुणांना कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे काम संसारे यांनी केले. आंबेडकरी समाजातील कलावंतांनाही संसारे यांनी नेहमीच संधी दिली. मनोज संसारे यांनी तळागाळातील प्रत्येक माणसाची मदत केली म्हणूनच त्यांच्या अंत्यविधीला लाखोंचा जनसागर लोटला होता.

5 / 5

एक विचार, एक भूमिका, आणि चळवळीशी असलेली आतुट बांधिलकी मी त्यांच्यात पाहिलीय. मनोज भाई आज जगात नसले तरी त्यांनी दिलेला विचार चळवळीला नव संजीवनी देणारा ठरेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us