AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी, शाहांना हटवून मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आनंदच; काँग्रेस नेत्याचं सूचक विधान

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधानपदाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काकांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना, वडेट्टीवार म्हणाले की, जर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना हटवून एखादा मराठी माणूस पंतप्रधान झाला तर त्यांना आनंदच होईल. या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे.

मोदी, शाहांना हटवून मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आनंदच; काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
Vijay WadettiwarImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 03, 2026 | 12:56 PM
Share

माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकांनी केलं होतं. त्यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना हटवून मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर आनंदच आहे, असं सूचक विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. वडेट्टीवार यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे सूचक विधान केलं. मुख्यमंत्री फडणवीस हे पंतप्रधान व्हावेत हे त्यांच्या नातेवाईकांना, भावाला वाटणे स्वभाविक आहे. मात्र ते ठरवणारे गुजरातचे दोन आहेत. आमची सत्ता आली तर आमचे नेते ठरवतात. त्यांची सत्ता आली ते ठरवतील. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना हटवून महाराष्ट्रातील मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आनंद आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

आसारामचे चेले असतील

यावेळी त्यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या फुटप्रिंटच्या विधानाचीही खिल्ली उडवली. चंद्रकात पाटील हे आसाराम किंवा रामरहिमचे चेले असतील. किंवा रामदेव आणि बागेश्वर यांच्याकडून त्यांनी ही कला शिकली असेल, म्हणून त्यांना असे वाटत असेल, असा चिमटा वडेट्टीवार यांनी काढला.

संघाला कुठून फंडिंग येते?

अभिजीत दीपके यांच्या संघटनेला विदेशी फंडिग येते की नाही? याची चौकशी राज्य सरकार करणार आहे. त्यावरही वडेट्टीवार यांनी भाष्य केलं. आंदोलन करणाऱ्या तरुणाला देशद्रोही म्हणत असाल तर आरएस एसही देशद्रोही आहे. संघाला कुठून फंडिंग होते हे संघाने उघड करावे. संघ नोंदणी करत नाही. जनतेला हिशोब देत नाही. इंग्रजाच्या मागे धावणारी संघटना देशातील तरुणांना देशद्रोही म्हणत असेल तर जनता यांची जागा दाखवेल, असा इशाराच त्यांनी दिला.

हे देवाला घाबरत नाहीत

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपातून भाजप नेते बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते होणारच होतं. महिला खेळाडू आमच्यावर अत्याचार झाल्याचं ओरडून सांगत होत्या. त्यावेळी बृजभूषण सिंहचे गुणगान गात होते. काहीही करा फक्त आमच्यासोबत रहा. तुम्हाला ईडी, कोर्ट सगळीकडून मुक्त करू. बलात्काऱ्यांची मिरवणूक काढतात. हे देवाला मानत नाही असे सांगितलं जात आहे. संघ आणि भाजप देवाला मानत नाही. त्यामुळे यांना देवाची भीती असती तर तो माणूस निर्दोष मुक्त झाला नसता, असंही ते म्हणाले.

Follow Us
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...