AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budhaditya Rajyog 2026: पुढील 10 दिवसांत या राशींच्या लोकांच्या मनात जे येईल तेच होईल, राजयोगाचा होणार फायदा!

Budhaditya Rajyog 2026 : आयुष्यात चांगले वाईट दिवस येत जात राहतात. पण काही वेळा असं होत की ग्रह बदलतात आणि त्याचे चांगले वाईट परिणाम त्या राशींच्या लोकांवर होत असतात. आता देखील विशेष राजयोग तयार होत आहे... ज्याचा काही राशींना फायदा होणार आहे.

Budhaditya Rajyog 2026: पुढील 10 दिवसांत या राशींच्या लोकांच्या मनात जे येईल तेच होईल, राजयोगाचा होणार फायदा!
| Updated on: Sep 19, 2026 | 10:46 AM
Share

Budhaditya Rajyog 2026 : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. 17 सप्टेंबर रोजी सूर्याने सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश केला.महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कन्या राशीचा स्वामी बुध आहे. जेव्हा सूर्य कन्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा बुध आधीच त्यात असतो, त्यामुळे या दोन ग्रहांची युती त्याच राशीत होईल. यामुळे एक शुभ बुधादित्य राजयोग निर्माण होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणदे, हा राजयोग 26 सप्टेंबरपर्यंत टिकेल. ज्याचे चांगले परिणाम काही राशींवर दिसून येतील… तर जाणून घ्या कोणत्या आहे त्या राशी…

वृषभ : या राशीचे विद्यार्थी अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करतील. त्यांना परीक्षेत चांगले गुण मिळवतील. नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची आवड वाढेल. लेखन, माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रगतीच्या संधी मिळतील. तुम्ही आधीच कोणतीही गुंतवणूक केली असल्यास, तुम्हाला त्यातून चांगला नफा मिळेल. व्यावसायिकांना नवीन करारांमधून नफा मिळण्याची शक्यता आहे.

सिंह : सिंह राशीच्या दुसऱ्या घरात बुध आणि सूर्याच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग निर्माण होईल. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल आणि कामात पदोन्नती व पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या क्षमतांचा पुरेपूर वापर करून अनेक कामे यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. हा काळ व्यावसायिकांसाठी खूप अद्भुत आणि फायदेशीर असेल. तथापि, बोलताना काही प्रमाणात संयम बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

कन्या : जेव्हा बुध आणि सूर्य कन्या राशीच्या पहिल्या घरात असतात, तेव्हा बुधादित्य राजयोग तयार होतो. यामुळे या राशीच्या व्यक्तींची करिअरविषयक निर्णयक्षमता आणि व्यक्तिमत्त्व सुधारेल. जे नोकरी करत आहेत त्यांना पदोन्नतीची संधी मिळेल. मीडिया, लेखन आणि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठा फायदा होईल. पण कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करणे टाळा.

वृश्चिक : या राशीच्या लोकांना चांगला आर्थिक लाभ, पदोन्नती इत्यादी मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला व्यवसायात नवीन कंत्राटे मिळतील, ज्यामुळे चांगला नफा होईल. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तुम्हाला आर्थिक प्रयत्नांमध्ये चांगलं यश मिळेल. तुमचे करिअरही उत्कृष्ट राहील.

धनु : या राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टीने हे खूप चांगलं असेल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला या काळात तशा संधी मिळतील. जे नोकरी करत आहेत त्यांना पदोन्नती आणि पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांना अनपेक्षित नफा मिळेल. हे मुख्यत्वे कठोर परिश्रमाचे फळ असेल.

मकर : विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळतील आणि ते परीक्षेत यशस्वी होतील. जे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना या काळात चांगली बातमी मिळेल. जर तुम्हाला परदेशात जायचे असेल, तर तुम्हाला या काळात तशा संधी मिळतील. तुम्ही परदेशात किंवा इतर देशांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीच्या संधी शोधायला येऊ शकता.

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. )

Follow Us
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा