Aurangabad | उन्हाच्या झळांनी हैराण, वाघोबानंही घेतलं थंड पाणी, पहा कसा मस्त लोळतोय…

Reporter Datta Kanwate | Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 01, 2022 | 1:03 PM
1 / 5
राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेचा फटका विदर्भ आणि मराठवाड्याला जास्त बसतोय. औरंगाबादच्या उन्हानंही चाळीशी पार करत 42 अंशांची पातळी गाठली आहे. औरंगाबादकरांना तर हा कडाका असह्य झालाच आहे, पण सिद्धार्थ उद्यानातील प्राण्यांनाही उन्हाच्या तीव्रतेचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना थंड पाण्याने अंघोळ घातली जात आहे.

2 / 5

मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयात प्राण्यांना उष्णतेचा त्रास होत आहे. त्यामुळे उद्यान प्रशासनाने त्यांची काहीली दूर करण्यासाठी थंड पाण्याने अंघोळ घातली.

3 / 5

उन्हानं हैराण झालेल्या वाघोबावर प्राणीसंग्रहालय कर्मचाऱ्याने थंड पाण्याचा पाइप धरताच त्याने या पाण्याचा मनसोक्त आनंद लुटला. हे पाहण्यासाठी आणखी वाघही तेथे आले. त्यांनीही या वाघाला अंघोळीचा आनंद लुटू दिला.

4 / 5

विविध प्राणी संग्रहालयांमध्ये उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी प्राण्यांची वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घेतली जाते. औरंगाबादमध्ये मात्र अगदी साध्या पद्धतीने वाघांना थेट थंड पाण्याच्या पाइपने अंघोळ घातली जात असून हे वाघोबा त्याचाही मनसोक्त आनंद लुटत आहेत.

5 / 5

राज्यातील उष्णतेची लाट 2 एप्रिलपर्यंत कायम राहणार असून पुढील काही दिवस तापमानातील वाढ कायम राहिल, असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे उद्यान प्रशासनातर्फे प्राण्यांना सुसह्य वातावरण देण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us