वयाच्या 92 व्या वर्षी डॉक्टर झाला गोड मुलाचा बाप, आईचं वय 37 वर्ष!

सध्या एका 92 वर्षांचे डॉक्टर वडील झाले आहेत. त्यांची पत्नीदेखील डॉक्टरच आहे. आई झालेल्या डॉक्टरचे वय 37 वर्षे आहे. त्यांना आता एक बाळ झाले असून दोघेही आनंदी आहेत.

| Updated on: Oct 16, 2025 | 10:01 PM
1 / 6
या जगात कधी कोणता चमत्कार होईल हे सांगता येत नाही. काही काही महिलांनी एकाच वेळ तीन-तीन बाळांना जन्म दिल्याचे आपण ऐकलेले असेल. काही महिला तर 50 वर्षांच्या झाल्या तरी आई होतात. सध्या मात्र एक अजब प्रकार चर्चेत आला आहे.

2 / 6
ऑस्ट्रेलियात एका 92 वर्षाच्या डॉक्टराला आपल्या 37 वर्षांच्या पत्नीपासून गोड मुलगा झाला आहे. या डॉक्टरचे नाव जॉन लेव्हिन असे आहे. त्याची पत्नीदेखील डॉक्टर असून तिचे नाव यानयिंग लू असे आहे. या दाम्पत्याने त्यांच्या मुलाचे नाव गॅबी असे ठेवले आहे.

3 / 6
डॉक्टर जॉन लेविन आणि यानयिंग लू यांना 65 वर्षांचा एक मुलगा होता. या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर पाच महिन्यानंतर त्यांना आता गॅबी नावाचा मुलगा झाला आहे.

4 / 6
मृत्यू झालेल्या त्यांच्या मुलाचे नाव ग्रॅग असे होते. मोटार न्यूरॉनच्या आजारामुळे त्याचा मृत्यू झाला होता. डॉ. जॉन यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात यानयिंग लू आल्या. त्या मूळच्या चीनच्या आहेत. 2014 साली या दोघांनीही लग्न केले.

5 / 6
या दोघांनीही अगोदर आपल्याला बाळ नको, असाच विचार केला होता. मात्र लॉकडाऊननंतर त्यांचा विचार बदलला. माझ्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा अंश माझ्याजवळ असावा, या उद्देशाने डॉ. यानयिंग यांनी बाळ जन्माला घालण्याचा निर्णय घेतला.

6 / 6
त्यानंतर आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने  यानयिंग गर्भवती राहिल्या. या तंत्राच्या मदतीने पहिल्याच प्रयत्नात त्या गर्भवती राहिल्या. आता त्यांच्या घरी छोटंसं बाळ आलं असून ते आनंदी आहेत. लोकांनी सुरुवातीला वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पण आता मात्र हे दाम्पत्य आनंदी आहे.