
जेवणातील महत्वाचा घटक लिंबू आहे. अनेकांचे लिंबूशिवाय जेवण पूर्ण होतच नाही. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि डिटॉक्सिफायिंग गुणधर्म असतात.

लिंबू खाल्ल्याने पचन क्रिया सुधारते आणि त्वचेचा रंग देखील चांगला होतो. विशेष म्हणजे लिंबू हे वजन कमी करण्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे.

लिंबू जर काही पदार्थांसोबत खाल्ले तर ते विष बनते. ज्यामुळे अॅलर्जी, गॅस आणि त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

दूध आणि दुधाच्या पदार्थांसोबत लिंबू सेवन करू नये. यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. दूध आणि लिंबू एकत्र खाल्ल्याने गॅसची समस्या देखील होऊ शकते.

अंडी हे प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. मात्र, कधीही अंडी आणि लिंबू एकत्र खाऊ नका. यामुळे पोटाच्या अनेक गंभीर समस्या या निर्माण होऊ शकतात.