ना कथेत दम, ना अभिनयात.. तरी बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर 2’सारखी कमाल; सर्वच चकीत!
रणवीर सिंहच्या 'धुरंधर 2'सारखी कमाल करून दाखवणारा हा या वर्षातील दुसरा चित्रपट ठरला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची होणारी कमाई पाहून सर्वच जण थक्क झाले आहेत. हा चित्रपट कोणता आहे, ते जाणून घ्या..

14 ऑगस्ट 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला एक चित्रपट अगदी पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. इतकंच नव्हे तर फक्त पाच दिवसांत या चित्रपटाने बजेटच्या दुप्पट कमाई करून सर्वांनाच चकीत केलं आहे. यासोबतच या चित्रपटाने अशी मोठी कमाल केली आहे, जी यावर्षी रणवीर सिंहच्या 'धुरंधर 2' या ब्लॉकबस्टर चित्रपटाने केली होती.

विशेष म्हणजे या चित्रपटाची कथा दमदार नाही आणि त्यातील कलाकारांचं अभिनयही तितकं प्रभावी नाही. समिक्षकांकडून या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असतानाही थिएटरमध्ये प्रेक्षक मात्र गर्दी करत आहेत. आतापर्यंत या चित्रपटाने भारतात 100.75 कोटी रुपये नेट कमाई केली असून ग्रॉस कमाईचा आकडा 120.33 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जगभरात या चित्रपटाने 144.13 कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलं आहे.

हा चित्रपट दुसरा-तिसरा कोणता नसून इमरान हाश्मीचा 'आवारापन 2' आहे. या चित्रपटाचा बजेट 45 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. प्रदर्शनाच्या पाच दिवसांत या चित्रपटाने 55.75 कोटी रुपयांचा 'रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट' (ROI) मिळवला आहे. रिटर्नची ही टक्केवारी तब्बल 123.88% इतकी आहे. म्हणूनच भारतीय बॉक्स ऑफिसवर याला 'हिट'चा दर्जा मिळाला आहे.

2026 मध्ये अशी मोठी कमाल करणारा हा 'धुरंधर 2'नंतर दुसरा चित्रपट ठरला आहे. इमरान हाश्मीच्या 'आवारापन 2'ने अत्यंत सहजतेने हिटचा टॅग मिळवला आहे. आता हा चित्रपट सुपरहिट ठरतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सुपरहिटचा टॅग मिळवण्यासाठी या चित्रपटाला 150 टक्क्यांनी रिटर्न मिळवावा लागेल. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता येत्या वीकेंडपर्यंत 'सुपरहिट'चा टॅग मिळू शकतो, असा अंदाज आहे.

'आवारापन 2' हा 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आवारापन'चा सीक्वेल आहे. तब्बल 19 वर्षांनंतर हा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये इमरान हाश्मीसोबत दिशा पटानी आणि शबाना आझमी यांच्याही भूमिका आहेत.