
गुम है किसी के प्यार में मालिकेत सई हिची भूमिका साकारणारी अभिनेत्री अर्थात आयशा सिंह ही नेहमीच चर्चेत असते. आयशा सिंह हिची जबरदस्त फॅन फाॅलोइंग आहे.

आयशा सिंह हिने अत्यंत कमी वेळामध्ये एक वेगळी ओळख ही नक्कीच मिळवलीये. आयशा सिंह ही बिग बाॅस 17 मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा तूफान रंगत आहे.

बिग बाॅस 17 मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर अखेर आयशा सिंह हिने माैन सोडले. आयशा सिंह म्हणाली की, होय हे खरे आहे की, मला बिग बाॅस 17 ची आॅफर आलीये.

पुढे आयशा सिंह म्हणाली, मी लगेचच बिग बाॅस 17 मध्ये सहभागी होणार नाही. कारण मला माझ्या अभिनयाकडे सध्या लक्ष केंद्रित करायचे आहे.

भविष्यात मी बिग बाॅसमध्ये सहभागी होण्याचा विचार नक्कीच करेल. मात्र, सध्याच मी शोमध्ये सहभागी होणार नाहीये. आता यामुळे सई हिच्या चाहत्यांमध्ये निराशा बघायला मिळतंय.