
'बालवीर' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता देव जोशी नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. 25 फेब्रुवारी रोजी नेपाळमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो देवने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

कुटुंबीय आणि जवळच्या पाहुण्यांच्या उपस्थितीत देवने आरतीशी लग्न केलं. 'अहं त्वदस्मि मदसि त्वम्! में तुझसे और तू मुझसे 25/2/25, ही तारीख कायम लक्षात राहील,' अशी पोस्ट त्याने लिहिली आहे. या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

लग्नसोहळ्यात आरतीने लाल रंगाचा सुंदर लेहंगा परिधान केला होता. तर देवने क्रिम कलरची शेरवानी घातली होती. देवने त्याच्या इन्स्टाग्रामवर हळद आणि मेहंदी कार्यक्रमाचेही फोटो शेअर केले आहेत.

6 फेब्रुवारी रोजी देवने आरतीशी साखरपुडा केला. तर 22 फेब्रुवारी रोजी देव आणि आरती त्यांच्या कुटुंबीयांसह नेपाळला लग्नासाठी गेले. लग्नापूर्वीचे कार्यक्रमसुद्धा तिथेच पार पडले.

'बालवीर' या लोकप्रिय मालिकेचा चौथा सिझन गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'बालवीर रिटर्न्स' असं या मालिकेचं नाव असून सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तो पाहता येईल. चौथ्या सिझनमध्येही देवने मुख्य भूमिका साकारली आहे.