
4. डिस्क्लेमर : बाबा वेंगाच्या भविष्यवाण्यांवर संपूर्ण विश्वास ठेवणं योग्य नाही. वैज्ञानिक संस्था, हवामान खातं, आणि आपत्ती व्यवस्थापन यांच्या सूचनाचं आणि माहितीचं पालन करा. टीव्ही 9 मराठी या दाव्याबाबत कुठलाही दावा करत नाही अथवा त्याला दुजोरा देत नाही.

सोव्हिएत युनियनचं विघटन, 9/11 चा हल्ला, आणि राजकुमारी डायनाचा मृत्यू, जपानमधील त्सुनामी हे भाकीत खरी ठरल्याचा दावा तिचे समर्थक करतात. अर्थात या दाव्यांना कुठलाही शास्त्रीय आधार नाही.

बाबा वेंगा यांच्या मते 2025 मध्ये माणुसकीच्या अधोगतीची सुरुवात होणार आहे. यामागे युद्ध हे सर्वांत मोठं कारण ठरू शकतं.

सध्याच्या घडीला भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने बाबा वेंगा यांची भविष्यवाणी फार चिंताजनक आहे.

युरोपबद्दल बोलायचं झाल्यास 2022 च्या सुरुवातीलाच रशिया-युक्रेनच्या युद्धाने केवळ युरोपलाच नाही तर संपूर्ण जगात चिंतेचं वातावरण निर्माण केलं होतं.

अमेरिका, नाटो आणि युपीय संघासारख्या प्रमुख देशांच्या सहभागाने रशिया-युक्रेनच्या युद्धाला आणखीनच धोकादायक बनवलं आहे.

बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. यामध्ये कोरोना महामारी, 2004 मधील त्सुनामी, 9/11 हल्ला यांसारख्या मोठ्या घटनांचा समावेश होता.

बाबा वेंगा यांचा जन्म 1911 मध्ये झाला होता. त्यांचा मृत्यू 1996 झाला होता. लहानपणी झालेल्या एका दुर्घटनेत बाबा वेंगा यांनी दृष्टी गमावली होती. त्या घटनेनंतरच त्यांना भविष्य पाहण्याची शक्ती मिळाल्याचं म्हटलं जातं.