
प्रत्येक व्यक्तीला त्याचं भविष्य जाणून घेण्याची इच्छा असते, नवं वर्ष आपल्याला कसं जणार? नव्या वर्षात आपल्यासोबत कोणत्या घटना घडणार याबाबत त्याला मोठी उत्सकता असते. त्यासाठी तो एखाद्या भविष्यवेत्त्याकडे जातो.

जगात आजपर्यंत असे अनेक भविष्यवेत्ते होऊन गेले जे आपल्या भविष्यवाणीसाठी प्रसिद्ध आहेत. यामध्ये नास्त्रोदम आणि बाबा वेंगा यांचा देखील समावेश होतो.

बाबा वेंगा यांचा जन्म बल्गेरियामध्ये झाला, असं मानलं जातं की लहाणपणीच एका वादळात सापडल्यामुळे त्यांनी आपली दृष्टी गमावली आणि तिथून पुढे त्यांना दिव्य दृष्टीची प्राप्त झाली.

बाबा वेंगा यांनी आपल्या आयुष्यात अनेक भविष्यवाणी केल्या त्यातील काही खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो. ज्यामध्ये अमेरिकेवरील दहशतवादी हल्ला, हिटरलचा मृत्यू, जपानमध्ये आलेली त्सुनामी अशा काही घटनांचा समावेश आहे.

बाबा वेंगा यांनी 2025 बद्दल भलतच भयानक भाकीत वर्तवलं आहे. हे वर्ष म्हणजे जगाच्या अंताची सुरुवात असणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. या वर्षांत अशा अनेक घटना घडतील ज्या मानवाच्या अकलनाबाहेर असतील असंही त्यांनी आपल्या भविष्यवाणीमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान बाबा वेंगा यांनी मेष राशीच भविष्य वर्तवताना 2025 हे वर्ष म्हणजे या राशींच्या लोकांसाठी सुवर्ण काळ असणार आहे असं म्हटलं आहे. या वर्षी तुमची जी स्वप्न आहेत ती सर्व स्वप्न साकार होतील. गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या मनात एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल तर ती पूर्ण होण्याचे योग आहेत असं म्हटलं आहे.

तसेच या वर्षी मेष राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती देखील उत्तम राहणार आहे, आर्थिक उत्पन्नाचा एखादा नवा स्त्रोत उपलब्ध होईल असंही बाबा वेंगा यांचं भाकीत आहे. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)