“पैसे हवे तेव्हा बाबा आठवतात, नाहीतर…” स्मिता पाटीलच्या लेकावर भडकला राज बब्बर यांचा मुलगा, घरगुती वाद चव्हाट्यावर

मात्र याचदरम्यान, प्रतीकने वडील राज बब्बर यांच्या विरोधात बोलणे सुरूच ठेवलंय, ज्यामुळे त्याचा सावत्र भाऊ आर्य बब्बर चांगलाच संतापला.त्याने प्रतीकवर आपल्या वडिलांचा अपमान केल्याचा आरोप करत हल्ला चढवनला. त्यांचा घरचा वाद आता चव्हाट्यावर आलाय.

| Updated on: May 23, 2026 | 12:20 PM
1 / 8
बब्बर कुटुंबातील वाद आता घरगुती न राहता तो सर्वांसमोर आला आहे. प्रतीकने आधीच त्याचं आडनाव बदलून आणि लग्नात वडीलांना न बोलावून याचे संकेत दिले होते. आता राज बब्बर यांचा मोठा मुलगा, आर्य बब्बर, याने आपला धाकटा, सावत्र  भाऊ प्रतीक याच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. प्रतीक आपल्या वडिलांचा अनादर करत असून केवळ स्वतःच्या सोयीसाठी त्यांच्या जवळ जातो, असा मोठा, गंभीर आरोप आर्यने लावला आहे. प्रतीकने केवळ आपले आडनावच बदललं नाही, तर आपल्या वडिलांना आणि कुटुंबाला लग्नातून वगळले, तेव्हा कुटुंबातील कटुता अधिकच वाढली. (All Photos : Instgram / Social Media)

2 / 8
आर्य बब्बरने विकी लालवाणी याला मुलाखत दिली, तेव्हा तो या नात्यावर बोलला. हे नातं खूप नाजूक मानून मी ते नेहमी जपण्याचा प्रयत्न केला. प्रतीकबद्दल माझ्या मनात नेहमीच भावासारखं प्रेम होतं, पण प्रतीकने अचानक आपल्या कुटुंबाशी संबंध तोडले, असं आर्य बब्बरने सांगितलं.  त्याच्या म्हणण्यानुसार, पत्नीसोबतच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होताच, प्रतीकने आपल्या कुटुंबाशी संवाद साधणे बंद केलं, मात्र मी त्याला कॉल आणि मेसेजद्वारे अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा आर्यने केला.

3 / 8
या मुलाखतीत आर्यने प्रतीकवर कडाडून हल्ला चढवला.  'सोयीला प्राधान्य देणाऱ्या' प्रतीकच्या वृत्तीवर त्याने टीकास्त्र सोडलं.  तो म्हणाला की, "जेव्हा त्याचं (प्रतीक)  करिअर अडचणीत असतं किंवा त्याचे खिसे रिकामे असतात, तेव्हा वडील (राज बब्बर) आठवतात. पण जेव्हा जाहीरपणे वडिलांचा सन्मान करण्याची वेळ येते, तेव्हा प्रतीक मागे हटतो." असा आरोप त्याने केला. हे अतिशय चुकीचं असून भाऊ असल्याने मी आता या मुद्यावर शांत बसणार नाही, असंही त्याने सांगितलं.

4 / 8
राज बब्बर यांनी स्मिता पाटील यांच्यासाठी खरेदी केलेल्या त्याच आलिशान घरात प्रतीक अजूनही राहतो, त्यावरूनही आर्यने प्रश्न उपस्थित केला. त्याच्या वडिलांनी दिलेल्या सुखसोयी आणि ऐषारामाचा आनंद घेतो, पण सार्वजनिक ठिकाणी वडिलांचे नाव घ्यायला प्रतीकला आवडत नाही, अशी टीका त्याने केली. त्याला पॉकेटमनी आणि घराची गरज असते तेव्हाच त्याला वडिलांची आठवण येते, इतर वेळी नाही, असंही आर्य पुढे उपहासाने म्हणाला.

5 / 8
यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देताना आर्यने, ही एक मोठी शोकांतिका असल्याचं  म्हटलं. तो म्हणाला की, त्याचे वडील राज बब्बर यांनी आपल्या आई स्मितासाठी सर्वस्व पणाला लावले होते, अगदी आपल्या पहिल्या कुटुंबालाही सोडून दिलं होतं. आज त्याच आईडा, स्मिता पाटील यांचा मुलगा आपल्या वडिलांना स्वीकारायला तयार नाही. राज बब्बर यांच्यासाठी हा एक मोठा भावनिक धक्का असल्याचं आर्यने सांगितलं.

6 / 8
राज बब्बर यांचे आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलंय. त्यांनी 1975 मध्ये नादिरा बब्बर यांच्याशी लग्न केलं आणि त्यांना आर्या व जुही ही दोन मुले झाली. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात स्मिता पाटील आल्या. मिळालेल्या माहितीनुसार, नादिरापासून विभक्त झाल्यानंतर राज यांनी स्मिता यांच्याशी लग्न केले. मात्र, प्रतीकच्या जन्माच्या सुमारास, 1986  मध्ये स्मिता यांचे निधन झाले आणि राज नादिरा यांच्याकडे परतले, ज्यांनी प्रतीकचेही संगोपन केले.

7 / 8
नादिरा बब्बर आणि त्यांच्या कुटुंबाला नेहमी खलनायक म्हणून दाखवलं जातं, असं आर्यनचं म्हणणं आहे, पण प्रत्यक्षात त्यांचे प्रतीकवर नेहमीच प्रेम होतं.  प्रत्येक कथेत प्रतीकस्वतःला पीडित म्हणून दाखवतो, पण प्रत्यक्षात तो एका ज्येष्ठ अभिनेत्याचा मुलगा असल्याचा प्रत्येक शक्यतेचा फायदा घेतो, असा आरोप आर्यने केला.

8 / 8
एक मोठा भाऊ म्हणून मी प्रतीकच्या पाठीशी नेहमीच उभा राहीन, पण आता माझ्या मनात प्रतीकबद्दल पूर्वीसारखे प्रेम आणि आदर राहिलेला नाही, असं भावूक होत तो म्हणाला. त्यांच्या नात्यातील ही दरी आता अधिकच रुंदावत असल्याचे दिसत आहे. बब्बर कुटुंबातील वाद आणि त्यांच्यातील दरी आणखीनच वाढल्याचं दिसत आहे.

Follow Us