ना निवडणूक लढवली, ना मंत्री झाले, तरीही एका इशाऱ्यावर… सत्तेचा मोह नसलेल्या किंगमेकर बाळासाहेब ठाकरेंबद्दल बरचं काही…

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज १०० वी जयंती. एक सामान्य व्यंगचित्रकार ते महाराष्ट्राचे 'रिमोट कंट्रोल' असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आणि शिवसेनेच्या स्थापनेची संपूर्ण कथा

| Updated on: Jan 23, 2026 | 11:07 AM
1 / 12
महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरे हे नाव म्हणजे एक धगधगता विचार आहे. २३ जानेवारी हा त्यांचा जन्मदिन. ज्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही, जे कधीही कोणत्याही अधिकृत पदावर बसले नाहीत, तरीही महाराष्ट्राचे सरकार त्यांच्या एका शब्दावर चालत असे.

2 / 12
आज बाळासाहेब ठाकरे यांची १०० वी जयंती आहे. या जयंतीनिमित्त आपण एका सामान्य व्यंगचित्रकाराने मराठी माणसाच्या मनात आणि देशाच्या राजकारणात आपले स्थान कसे निर्माण केले, याचा आढावा घेणार आहोत.

3 / 12
बाळासाहेबांच्या आयुष्याची सुरुवात कोणत्याही राजकीय वारशाने झाली नाही. त्यांचे वडील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे मोठे समाजसुधारक होते. त्यांच्याकडूनच बाळासाहेबांना मराठी अस्मितेचा वारसा मिळाला.

4 / 12
बाळासाहेबांनी आपली कारकीर्द फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून सुरू केली. एका कागदावर आपल्या ब्रशने राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्याची त्यांची कला अजोड होती. पण केवळ चित्रे काढून अन्याय दूर होणार नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी १९६० मध्ये मार्मिक हे साप्ताहिक सुरू केले.

5 / 12
या साप्ताहिकाने मराठी तरुणांमध्ये आपल्या हक्कांसाठी लढण्याची जिद्द निर्माण केली. मराठी माणसाला त्याच्या हक्काची नोकरी मिळावी आणि मुंबईत त्याचा मान राखला जावा, या हेतूने १९ जून १९६६ रोजी बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली.

6 / 12
सुरुवातीच्या काळात त्यांनी मराठी माणसाला न्याय हा मुद्दा लावून धरला. यानंतर बघता बघता मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील तरुण त्यांच्याशी जोडले गेले. बाळासाहेबांचे व्यक्तिमत्व इतके प्रभावी होते की, त्यांच्या एका हाकेवर संपूर्ण मुंबई ठप्प होत असे.

7 / 12
बाळासाहेब ठाकरे हे भारतीय राजकारणातील असे एकमेव नेते होते, ज्यांनी सत्तेची खुर्ची कधीच स्वतःकडे घेतली नाही. १९९५ मध्ये महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले, पण बाळासाहेब स्वतः मुख्यमंत्री झाले नाहीत. त्यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री केले.

8 / 12
त्यावेळी लोक म्हणायचे की या सरकारचा रिमोट कंट्रोल मातोश्रीवर म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंच्या निवासस्थानी आहे. याचा अर्थ असा होता की, सरकारचे महत्त्वाचे निर्णय हे बाळासाहेबांच्या सल्ल्यानेच घेतले जायचे. देशातील मोठे नेते आणि पंतप्रधान देखील त्यांना भेटायला स्वतः मातोश्रीवर येत असतं.

9 / 12
१९८० च्या दशकात बाळासाहेबांनी राजकारणाची दिशा बदलली. त्यांनी मराठी अस्मितेसोबतच हिंदुत्व हा मुख्य मुद्दा बनवला. १९८७ मध्ये त्यांनी गर्वाने सांगा, आम्ही हिंदू आहोत अशी घोषणा दिली.

10 / 12
१९९२ मध्ये बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर त्यांनी जाहीरपणे सांगितले की, जर ती माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल, तर मला त्यांचा सार्थ अभिमान आहे. त्यांच्या या निडर आणि स्पष्ट भूमिकेमुळे संपूर्ण देशाने त्यांना हिंदुहृदयसम्राट ही पदवी दिली.

11 / 12
बाळासाहेबांचे विचार नेहमीच स्पष्ट असायचे, त्यामुळे अनेकदा वादही झाले. त्यांच्या आक्रमक भाषणांमुळे निवडणूक आयोगाने त्यांच्यावर ६ वर्षांसाठी मतदानाची बंदी घातली होती. हिटलरची स्तुती असो किंवा आणीबाणीत दिलेला पाठिंबा, त्यांनी कधीही कोणाची भीती बाळगली नाही.

12 / 12
त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात पुतणे राज ठाकरे यांनी पक्ष सोडला, हा त्यांच्यासाठी मोठा वैयक्तिक धक्का होता. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या संख्येने लोक जमले होते. हा जनसागर हेच त्यांच्या लोकप्रियतेचे सर्वात मोठे प्रमाणपत्र होते.