ती 21 वर्षीय डिटेक्टिव्ह मुलगी कोण? जिला बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, हिच्या नजरेत आहे धाक..
बाळासाहेब ठाकरे हे महिलांचा नेहमीच आदर करत असत. त्यांच्या आयुष्यात अनेक व्यक्तींशी चांगले संबंध होते. त्यापैकी एक म्हणजे भारतातील पहिल्या महिला खासगी गुप्तहेर रजनी पंडित. त्यांच्या धाडसी व्यक्तिमत्त्वाने बाळासाहेबही प्रभावित झाले होते. ते प्रत्येकाला त्यांचा दाखला द्ययाचे आणि त्यांच्या कामाचं कौतुक करायचे.

रजनी पंडित यांनी अत्यंत कमी वयात गुप्तहेर क्षेत्रात पाऊल ठेवले. 1980 च्या दशकात त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. महिलांसाठी आव्हानात्मक असलेल्या या क्षेत्रात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
एका सार्वजनिक कार्यक्रमात रजनी पंडित यांनी बाळासाहेबांसोबत संवाद साधला होता. त्यावेळी बाळासाहेबांना रजनी पंडीत यांच्या कामाविषयी समजले. ते मनापासून आनंदी झाले. त्यांनंतर त्यांनी रजनी यांच्याशी खूप वेळ गप्पा मारल्या ते कहीदी म्हणायचे "ही बघा कशी मुलगी, हिच्या नजरेत धाक आहे."
रजनी पंडित एका छोट्या खोलीत राहत असल्याचे बाळासाहेबांना समजले. त्यानंतर त्यांनी रजनी आणि त्यांच्या कुटुंबाला हिरानंदानी येथे घर दिले होते.
एखाद्या प्रकरणात संशय असल्यास लोक त्यांना तपासासाठी बोलावतात. त्या वेगवेगळे वेश परिधान करून आणि स्वतःचा लूक बदलून माहिती व पुरावे गोळा करतात.
गुप्तहेर म्हणून काम करताना त्यांनी अनेक आव्हानांचा सामना केला. त्यांच्या धाडसामुळे आणि तपास करण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे त्यांनी विशेष ओळख निर्माण केली. त्यांनी आता पर्यंत 80 हजारहुन अधिक केसवर काम केले आहे.