बांगलादेश सरकार नट्यांच्या मागे हात धुवून लागलं… मेहरनंतर ‘या’ अभिनेत्रीविरोधात ॲक्शन; थेट तुरुंगातच डांबलं

Bangladesh Police Arrested Actresses : बांगलादेश सरकार सध्या अभिनेत्र्यांच्या मागे हात धुवून लागलं आहे. मेहर अफरोज शॉनंतर आता आणखी एका अभिनेत्रीला पोलीसांनी अटक केली आहे. सोहाना सबा हिची पोलीस कसून चौकशी करत आहेत. काय आहे तिच्यावर आरोप?

| Updated on: Feb 07, 2025 | 4:55 PM
1 / 5
भारताचा शेजारी देश बांगलादेशात सध्या मोठी अराजकता माजली आहे. देशात अभिनेत्री मेहर अफरोज शॉन हिला अटक करण्यात आली. त्यानंतर लागलीच सोहाना सबा हिला पण पोलीसांनी ताब्यात घेतले. गुप्तहेर पोलीस तिची कसून चौकशी करत आहेत.

2 / 5
सोहाना सबा ही पण लोकप्रिय नटी आहे. ढाका मेट्रोपॉलिटन पोलीस उपायुक्त मुहम्मद विल्बर रहमान यांनी गुरुवारी रात्री तिच्या अटकेची माहिती दिली. त्यापूर्वी पोलीसांनी मेहर अफरोज शॉन हिला ढाका येथील धनमंडी परिसरातून अटक केली.

3 / 5
गुप्तहेर खात्याचे पोलीस प्रमुख रेजाऊल करीम मल्लिक यांनी मेहर हिच्यावर देशाविरोधात कट कारस्थान रचण्याचा आरोप केला आहे. तिची मिंटो रोडवरील गुप्तहेर शाखेच्या कार्यालयात चौकशी करण्यात येत आहे.

4 / 5
देशद्रोहासारखा गंभीर आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. तर सोहाना सबा हिला का अटक करण्यात आली. तिच्यावर कोणता ठपका ठेवण्यात आला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोन्ही अभिनेत्रींची सध्या चौकशी सुरू आहे.

5 / 5
सोहाना सबा ही बांगलादेशातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपट केले आहेत. अनेक भूमिका गाजवल्या आहेत. तिच्या  अयना” आणि “ब्रिहोन्नोला” या चित्रपटांना बांगलादेशी नागरिकांनी डोक्यावर घेतले होते.