Bank Strike: आजच उरकून घ्या बँकेची सगळी कामं, कर्मचारी किती दिवसांच्या संपावर?
Bank Strike News: देशभरातील बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा संपबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

- देशभरातील बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे संयुक्त व्यासपीठ असलेल्या ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने ११ सप्टेंबर रोजी देशव्यापी संप करण्याचा आपला निर्णय कायम ठेवला आहे.
- संप पुढे ढकलण्याबाबत सरकार आणि बँक युनियन्स यांच्यात चर्चा झाली, परंतु युनियन्सना मान्य होईल असा कोणताही निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे, ११ सप्टेंबरचा संप आता निश्चित मानला जात आहे.
- युनियन्सच्या मते, बँकांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू करणे ही त्यांची प्रमुख मागणी आहे. जोपर्यंत सरकार यावर स्पष्ट निर्णय देत नाही किंवा अंमलबजावणीसाठी निश्चित मुदत देत नाही, तोपर्यंत संप मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. संपाच्या दिवशी बँक शाखांमधील सामान्य कामकाजावर परिणाम होऊ शकतो.
- बँक संघटनांनी ११ सप्टेंबरच्या संपाला एका मोठ्या आंदोलनाची सुरुवात म्हटले आहे. जर त्यांच्या मागण्यांवर तोडगा निघाला नाही, तर संघटनांनी २८ ते ३० सप्टेंबर या तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची आणि त्यानंतर २६ ऑक्टोबरपासून अनिश्चित काळासाठी संपाची घोषणा केली आहे.
- देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने शेअर बाजारांना कळवले आहे की, त्यांना ११ सप्टेंबरच्या संपाची नोटीस मिळाली आहे. बँकेने म्हटले आहे की, शाखा आणि कार्यालयांमध्ये सामान्य कामकाज सुरू ठेवण्यासाठी आवश्यक व्यवस्था केली आहे, परंतु या संपामुळे बँकिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता नाही.
Follow Us





