
गायिका आणि कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि बॉयफ्रेंड संकेत भोसले विवाहबंधनात अडकले आहेत. या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुगंधानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केली आहेत, ज्या फोटोंमध्ये ती ब्रायडल लूकमध्ये दिसत आहे.

फोटोमध्ये दोघंही प्रचंड सुंदर दिसत आहेत. सुगंधाचा लूक तर चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरला आहे.

हातावर मेंदीसोबतच बांगड्या, चेहऱ्यावर मेकअप. तिने आपल्या लेहेंग्यासोबत मॅचिंग दागिनेही कॅरी केले आहेत, तिचे फोटो चाहत्यांना घायाळ करत आहेत.

या व्यतिरिक्त सुगंधानं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मंडपातील प्रवेशापासून ते पाठवणीपर्यंतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. अर्थात तिनं प्रत्येक क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

26 एप्रिल 2021 रोजी सुगंधाने जालंधरच्या पंजाबमध्ये प्रियकर संकेत भोसलेसोबत लग्न केलं. यादरम्यान तिने आपल्या लग्नातील हळद, सोखरपुडा आणि मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटोही शेअर केलेत. संकेतनं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवरही अनेक फोटो शेअर केले आहेत.

पूजेनंतर सुगंधानं अनेक विधी पूर्ण केल्या. नवीन नवरीला पती आणि त्याच्या कुटुंबासाठी काहीतरी गोड बनवायचं असतं. फोटोंमधून असे दिसून येते की दोघांनी तेही पूर्ण केलं.

‘मी पारंपारिक महाराष्ट्रीयन गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतेय. "महाराष्ट्रीयन बायको" होण्यासाठी मी खूप उत्साही आहे.’ असं कॅप्शन देत सुगंधानं हे फोटो शेअर केले आहेत.