
नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा परीक्षेचा निकाल जाहीर झाला यामध्ये परळी तालुक्यातील पांगरी येथील अक्षय मुंडे याने 699 रॅक मिळवला.

नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा परीक्षेचा निकाल जाहीर झाला यामध्ये परळी तालुक्यातील पांगरी येथील अक्षय मुंडे याने 699 रॅक मिळवला.

अक्षय याच्या आईने त्याचे औक्षण देखील केले. त्यानंतर अक्षय मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

इथं माझा अभूतपूर्व स्वागत झालं आहे, असं स्वागत माझं कुठे होऊ शकत नाही. दिल्लीतून मी आज माझ्या गावात आलो परंतु प्रेम मी कधीच विसरू शकत नाही, अशा भावना त्याने व्यक्त केल्या

आईची मेहनत आणि बहिणीचा आशीर्वाद म्हणून मी यूपीएससी परीक्षेत यश संपादन करू शकलो. कुणाला बघून यूपीएससी करू नका, प्रोसेस समजून घ्या कोचिंगची गरज पडणार नाही.

यूपीएससीसाठी कमीत कमी दहा बारा तास अभ्यास करावा लागतो. परिस्थिती पुढे खचून जाऊ नका मेहनत करा, स्वत:वर विश्वास ठेवा मेहनत करत रहा. हे कुणीही करू शकते, अशी प्रतिक्रिया त्याने दिली.