10 वर्षे घाम गाळला, डोंगरालाही पाझर फुटला; आता होतेय लाखोंची कमाई; नक्की काय घडलं?

बीड जिल्ह्यातील पठाण मांडवा येथील शेतकरी लक्ष्मण जोगदंड यांनी डोंगराळ जमिनीत सरकारी योजनेच्या मदतीने सेंद्रिय आमराई फुलवली असून, त्यातून ते वार्षिक १.५ लाख रुपयांची कमाई करत आहेत.

| Updated on: May 12, 2026 | 3:15 PM
1 / 8
अंबाजोगाई तालुका दुष्काळी पट्ट्यात येत असला, तरी जिद्द आणि सरकारी योजनांच्या जोरावर शेतीचे नंदनवन कसे फुलवता येते, हे पठाण मांडवा येथील शेतकरी लक्ष्मण जोगदंड यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

अंबाजोगाई तालुका दुष्काळी पट्ट्यात येत असला, तरी जिद्द आणि सरकारी योजनांच्या जोरावर शेतीचे नंदनवन कसे फुलवता येते, हे पठाण मांडवा येथील शेतकरी लक्ष्मण जोगदंड यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

2 / 8

डोंगरदऱ्यात असलेल्या आपल्या ८ एकर जमिनीपैकी केवळ एका एकरात त्यांनी आंब्याची फळबाग फुलवली असून त्यातून ते वर्षाकाठी सुमारे दीड लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत.

3 / 8

जोगदंड यांची जमीन डोंगराळ भागात असल्याने तिथे पारंपारिक पिके घेणे अत्यंत जिकिरीचे होते. यावर उपाय म्हणून १० वर्षांपूर्वी त्यांनी अंबाजोगाई कृषी विभागाच्या फळबाग लागवड योजनेत सहभाग घेतला.

4 / 8

त्यांनी एका एकरात आंब्याची ५० रोपे लावली होती, त्यापैकी ४० झाडे आज फळांनी बहरुन उभी आहेत. या बागेला पाणी मिळावे यासाठी त्यांनी नरेगा (MGNREGA) योजनेतून विहीर खोदली, जी आज त्यांच्या शेतीसाठी मुख्य आधार ठरली आहे.

5 / 8

जोगदंड यांच्या बागेत केवळ एकच प्रकारचा आंबा नसून, विविधतेवर भर दिला आहे. त्यांच्याकडे प्रामुख्याने हापूस, रत्ना, केशर, दसरी आणि लोणच्याचा आंबा या जातींची झाडे आहेत.

6 / 8

विशेष म्हणजे, ते कोणत्याही रासायनिक फवारणीशिवाय पूर्णतः सेंद्रिय (Organic) पद्धतीने उत्पादन घेतात. नैसर्गिक चव आणि सेंद्रिय शेतीमुळे, स्वतः बाजारात जाऊन थेट विक्री करताना त्यांना इतरांपेक्षा अधिक बाजारभाव मिळतो.

7 / 8

सुरुवातीची पाच वर्षे काहीच उत्पन्न मिळाले नाही, पण झाडे मोठी झाल्यावर आता दरवर्षी १ ते दीड लाख रुपयांची विक्री होते. या पिकाला जास्त मशागत किंवा महागड्या फवारणीची गरज लागत नाही, फक्त वेळेवर पाणी दिले तरी शाश्वत उत्पादन मिळते," असे लक्ष्मण जोगदंड सांगतात.

8 / 8

गेल्या पाच वर्षांत त्यांनी ५ लाखांचे उत्पन्न घेतले आहे. यंदा आंब्याची सेटिंग उत्तम असल्याने दीड लाखांचा आकडा पार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us