AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs KKR Live Streaming : आरसीबी-केकेआर आमनेसामने, गतविजेत्यांसाठी निर्णायक सामना, मॅच किती वाजता?

Royal Challengers Bengaluru vs Kolkata Knight Riders IPL 2026 Live Scorecard: केकेआरला प्लेऑफची संधी फार कमी आहे. मात्र आरसीबी प्लेऑफच्या जवळ आहे. त्यामुळे आरसीबीला प्लेऑफमध्ये धडक देण्यासाठी केकेआर विरुद्धचा सामना अतिशय महत्त्वाचा असा आहे.

RCB vs KKR Live Streaming : आरसीबी-केकेआर आमनेसामने, गतविजेत्यांसाठी निर्णायक सामना, मॅच किती वाजता?
Rajat Patidar and Ajinkya Rahane RCB vs KKR IPL 2026Image Credit source: PTI
| Updated on: May 13, 2026 | 6:45 AM
Share

आयपीएल स्पर्धेचा 19 वा मोसम (IPL 2026) आता अखेरच्या टप्प्प्यात आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर झालं. त्यानंतर प्लेऑफसाठी आणखी चुरस वाढली आहे. या हंगामातून 2 संघ बाहेर झाले आहेत. त्यामुळे आता प्लेऑफमधील 4 जागांसाठी 8 संघांमध्ये लढत आहे. या 19 व्या मोसमातील 57 व्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत होणार आहे. रजत पाटीदार आरसीबीचं नेतृत्व करणार आहे. अजिंक्य रहाणे कोलकाताच्या कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना कधी?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना बुधवारी 13 मे रोजी होणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना कुठे?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना जियोहॉटस्टार एपद्वारे मोबाईल, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्हीवर लाईव्ह पाहायला मिळेल.

आरसीबीसाठी निर्णायक सामना, केकेआर अडचणी वाढवणार?

आरसीबीचा हा या मोसमातील 12 वा आणि केकेआरचा 11 वा सामना असणार आहे. आरसीबीने 19 व्या मोसमात आतापर्यंत 11 पैकी 7 सामने जिंकलेत. तर 4 वेळा आरसीबीचा पराभव झाला आहे. त्यामुळे आरसीबीला प्लेऑफमध्ये सुरक्षित पोहचायचं असेल तर कोणत्याही स्थितीत बुधवारी कोलकाता विरुद्ध जिंकावं लागणार आहे. तसेच केकेआरलाही प्लेऑफसाठी संधी आहे. त्यामुळे केकेआर कशी कामगिरी करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आला समोर
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्रेस
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर?