AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार

भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी… कारण अत्यंत चकित करणार

| Updated on: Jun 26, 2026 | 2:30 PM
Share

पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात आज भाजपमधील नाराजीचे नाट्य पाहायला मिळाले. भाजप नेत्या मेधा कुलकर्णी या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. मात्र, कार्यक्रमातील पहिल्या रांगेतील आसन व्यवस्थेवरून त्या नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात आज भाजपमधील नाराजीचे नाट्य पाहायला मिळाले. भाजप नेत्या मेधा कुलकर्णी या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. मात्र, कार्यक्रमातील पहिल्या रांगेतील आसन व्यवस्थेवरून त्या नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी भाजप नेते अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यात नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच इतर नेते देखील उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीतच हा प्रकार घडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पहिल्या रांगेत बसण्यावरून मेधा कुलकर्णी नाराज झाल्या आणि त्यांनी थेट कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ चर्चांना उधाण आले होते.

दरम्यान, या घटनेमुळे भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा रंगत आहे. मात्र, याबाबत पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे या नाराजीमागचे नेमके कारण काय, वाद नेमका पहिल्या रांगेत बसण्याचाच होता का? राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्क लावले जात आहेत.

Published on: Jun 26, 2026 02:30 PM

Follow Us