Aaditya Thackeray On PM Modi | मोदींचे मंत्री हे नियम पाळणार का? मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. जागतिक तणाव आणि आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी नागरिकांना परदेश दौरे टाळण्याचे, परदेशात लग्न समारंभ न करण्याचे आणि सोन्याची खरेदी कमी करण्याचे आवाहन केले होते. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना, “पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुका झाल्यानंतर आर्थिक परिस्थिती बिघडणार असल्याचे सांगत आहेत. नागरिकांना परदेशात जाऊ नका, सोनं खरेदी करू नका असे सल्ले दिले जात आहेत. मात्र हे नियम मोदी सरकारमधील मंत्री आणि भाजप पक्षही पाळणार आहेत का?” असा सवाल उपस्थित केला.
तसेच मंत्र्यांचे मोठे ताफे कमी होणार का, मंत्री परदेश दौरे टाळणार का, याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली. “देशाला नेमक्या कोणत्या आर्थिक परिस्थितीतून जावे लागणार आहे, याबाबत पंतप्रधानांनी स्पष्ट भाष्य करावे,” असेही ठाकरे म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधानांच्या वक्तव्यामुळे देशातील आर्थिक स्थितीबाबत राजकीय चर्चांना उधाण आले असून, विरोधकांकडून सरकारला लक्ष्य केले जात आहे.
Published on: May 12, 2026 04:19 PM
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्