AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs KKR : कोलकाता सलग पाचव्या विजयासाठी सज्ज, आरसीबीचा गेम करणार?

RCB vs KKR, IPL 2026 Preview : रॉयल चॅलेंजर्स प्लेऑफच्या उंबरठ्यावर आहे. तर केकेआरचं आव्हानही कायम आहे. त्यामुळे 13 मे आरसीबी विरुद्ध केकेआर यांच्यात होणाऱ्या सामन्यात कोणता संघ यशस्वी ठरतो याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

RCB vs KKR : कोलकाता सलग पाचव्या विजयासाठी सज्ज, आरसीबीचा गेम करणार?
KKR vs RCB IPLImage Credit source: PTI
| Updated on: May 13, 2026 | 9:06 AM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 57 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमसमोर कोलकाता नाईट रायडर्सचं आव्हान असणार आहे. आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. तर केकेआरला तुलनेत प्लेऑफची संधी कमी आहे. मात्र केकेआरचं स्पर्धेतील आव्हान कायम आहे. केकेआरने या हंगामात पहिल्या 6 पैकी 5 सामने गमावले. मात्र त्यानंतर केकेआरने जोरदार कमबॅक करत सलग 4 सामने जिंकले. त्यामुळे आता केकेआर 13 मे रोजी सलग आणि एकूण पाचवा सामना जिंकून आरसीबीचा गेम बिघडवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

केकेआरचं जोरदार कमबॅक

केकेआरचा मोसमातील पहिल्या सलग 2 सामन्यांत पराभव झाला. त्यानंतर पंजाब विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. त्यानंतर केकेआरने सलग 3 सामने गमावले. त्यामुळे आता केकेआरचं आव्हान संपुष्टात आल्याचं चित्र होतं. मात्र केकेआरने ड्रीम कमबॅक केलं. केकेआरने राजस्थान, लखनौ, हैदराबाद आणि दिल्लीला पराभूत केलंय.

केकेआरने लखनौवर सुपर ओव्हरमध्ये मात करुन 2 गुणांची कमाई केलीय. त्यामुळे केकेआरचा विश्वास दुणावलेला आहे. तसेच केकेआरने उर्वरित 4 सामने जिकंले तर त्यांचे एकूण 17 गुण होतील. ताज्या आकडेवारीनुसार, केकेआरच्या खात्यात 1O सामन्यांनंतर 9 गुण आहेत. केकेआर पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी आहे.

आरसीबी प्लेऑफच्या उंबरठ्यावर

तर दुसऱ्या बाजूला आरसीबीने 11 पैकी 7 सामने जिंकलेत. तर आरसीबीला 4 सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय. आरसीबीने सलग 2 पराभवानंतर गेल्या सामन्यात 10 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध शेवटच्या चेंडूवर थरारक विजय मिळवला. आरसीबीचे यासह एकूण 14 गुण झाले आहेत. त्यामुळे आरसीबीचा बुधवारी केकेआर विरुद्ध विजय मिळवून प्लेऑफमधील स्थान सुरक्षित करण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र आता त्यात आरसीबी किती यशस्वी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

केकेआर आरसीबीवर वरचढ

दरम्यान आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात एकूण 36 सामने खेळवण्यात आले आहेत. केकेआरने या 36 पैकी सर्वाधिक 20 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर आरसीबीने 15 सामन्यांत पलटवार करत केकेआरला पराभवाची धुळ चारली आहे. त्यामुळे आता उभयंघात होणाऱ्या 37 व्या सामन्यात कोण मैदान मारतो आणि 2 गुणांची कमाई करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत