AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs SRH : रबाडा-होल्डरचा कहर, गुजरातचा सर्वात मोठा विजय, हैदराबादचा 82 धावांनी धुव्वा

Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad Match Result, IPL 2026 : गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादवर एकतर्फी फरकाने मात करत पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.

GT vs SRH : रबाडा-होल्डरचा कहर, गुजरातचा सर्वात मोठा विजय, हैदराबादचा 82 धावांनी धुव्वा
Gill Rashid Rabada GT vs SRHImage Credit source: IPL X Account
| Updated on: May 13, 2026 | 2:45 AM
Share

साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांच्या अर्धशतकी तडाख्यानंतर जेसन होल्डर- कगिसो रबाडा या जोडीने प्रत्येकी 3-3 विकेट्स घेत गुजरात टायटन्सला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवून दिला आहे. गुजरातने आयपीएल 2026 (IPL 2026) स्पर्धेतील 56 व्या सामन्यात हैदराबादसमोर 169 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. त्यामुळे हैदराबाद हा सामना जिंकून 2 गुण मिळवेल असं वाटत होतं. मात्र गुजरातच्या गोलंदाजांनी कमाल केली. गुजरातच्या गोलंदाजांनी ठराविक अंतराने हैदराबादला झटके देत 168 धावांचा यशस्वी बचाव केला.

हैदराबादचं 86 धावांवर पॅकअप

हैदराबादला संपूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. गुजरातने हैदराबादला 31 बॉलआधी गुंडाळलं. गुजरातने हैदराबादला 14.5 ओव्हरमध्ये 86 रन्सवर गुंडाळलं. गुजरातने यासह 2 गुण मिळवले. गुजरातचा हा एकूण आठवा आणि सलग पाचवा विजय ठरला. गुजरातचा नरेंद्र मोदी स्टेडियमधील हा 19 व्या मोसमातील 6 सामन्यांतील चौथा विजय ठरला. गुजरातचा हा धावांबाबत सर्वात मोठा विजय ठरला. गुजरातने यासह प्लेऑफमधील आपलं स्थान जवळपास निश्चित केलंय. तर हैदराबादचा हा एकूण चौथा पराभव ठरला.

सामन्यात काय झालं?

सनरायझर्स हैदराबादने टॉस जिंकला. कॅप्टन पॅट कमिन्स याने फिल्डिंगचा निर्णय घेत गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं. हैदराबादच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवला. गुजरातसाठी दोघांनी अर्धशतक झळकावलं. मात्र त्यानंतरही गुजरातला 170 धावाही करता आल्या नाहीत. गुजरातसाठी ओपनर साई सुदर्शन याने सर्वाधिक 61 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर याने 50 धावांचं योगदान दिलं. निशांत सिंधू याने 22 धावा जोडल्या. त्याव्यतिरिक्त एकाहाती 20 पार पोहचता आलं नाही. हैदराबादसाठी प्रफुल हिंगे आणि साकीब हुसैन या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट मिळवली. तर पॅट कमिन्स याने 1 विकेट घेतली.

स्कोअरकार्ड

हैदराबादची घसरगुंडी

विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या हैदराबादला झटपट झटके दिले. त्यामुळे हैदराबाद जिंकणार नाही हे स्पष्ट होतं. त्यामुळे हैदराबादला धावा करुन पराभवातील अंतर कमी करण्याची संधी होती. मात्र हैदराबादसाठी कुणालाही 20 हा आकडाही गाठता आला नाही. हैदराबादसाठी कॅप्टन पॅट कमिन्स याने सर्वाधिक 19 धावा केल्या. सलील अरोरा 16, हेन्रिक क्लासेन 14 आणि इशान किशन याने 11 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. गुजरातकडून एकूण 5 जणांनी बॉलिंग केली. हे पाचही गोलंदाज यशस्वी ठरले. कगिसो रबाडा आणि जेसन होल्डर या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या. इम्पॅक्ट प्लेअर प्रसिध कृष्णा याने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर राशिद खान आणि मोहम्मद सिराज या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवत गुजरातला विजयी करण्यात योगदान दिलं.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत