AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs SRH : साई-सुंदरचं अर्धशतक, हैदराबादसमोर 169 रन्सचं टार्गेट, ऑरेंज आर्मी जिंकणार?

Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad, 1st Innings Highlights : सनरायझर्स हैदराबादने 19 व्या मोसमात एकूण 7 सामने जिंकले आहेत. तर गुजरात विरुद्ध जिंकायचं असेल तर 7.45 च्या रनरेटने धावा कराव्या लागणार आहेत.

GT vs SRH : साई-सुंदरचं अर्धशतक, हैदराबादसमोर 169 रन्सचं टार्गेट, ऑरेंज आर्मी जिंकणार?
Sai Sudharsan and Nishant SindhuImage Credit source: IPL X Account
| Updated on: May 12, 2026 | 10:40 PM
Share

ओपनर साई सुदर्शन आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाज वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी गुजरात टायटन्ससाठी आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 56 व्या सामन्यात अर्धशतक झळकावलं. मात्र त्यानंतरही गुजरातला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध 170 धावांचा आकडाही गाठता आला नाही. हैदराबादच्या गोलंदाजांनी चिवट बॉलिंग करत गुजरातला 168 धावांवर रोखण्यात यश मिळवलं आहे. हैदराबादने गुजरातला 5 झटके दिले. त्यामुळे ऑरेंज आर्मीला 169 धावांचं आव्हान मिळालं आहे. त्यामुळे हैदराबाद हा सामना जिंकणार की होम टीम गुजरात विजय मिळवून 2 गुणांची कमाई करणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

सनरायझर्स हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स याने टॉस जिंकून गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं. गुजरात घरच्या मैदानात सहज 200 धावा करेल, असा विश्वास चाहत्यांना होता. मात्र गुजरातची निराशाजनक सुरुवात झाली. कॅप्टन शुबमन गिल आणि अनुभवी फलंदाज जोस बटलर हे दोघेही दुहेरी आकडा गाठण्यात अपयशी ठरले. शुबमनने 5 तर बटलरने 7 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यानंतर गुजरातच्या फलंदाजांनी भागीदारी करण्याचा प्रयत्न केला. मात्र एकाही जोडीला अर्धशतकी भागीदारी करता आली नाही.

साई-सुंदरचं अर्धशतक

निशांत सिंधु याने 14 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 3 फोरसह 22 रन्स केल्या. साई सुदर्शन याने अर्धशतक झळकावलं. मात्र त्याला वेगात धावा करता आल्या नाहीत. साईने गुजरातसाठी सर्वाधिक धावा केल्या. साईने 44 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 61 धावा केल्या.

वॉशिंग्टन सुंदर यानेही अर्धशतक केलं. सुंदरने 33 बॉलमध्ये 151.52 च्या स्ट्राईक रेटने 50 रन्स केल्या. सुंदरने या खेळीत 1 षटकार आणि 7 चौकार लगावले. तर जेसन होल्डर आणि राहुल तेवतिया हे दोघे नाबाद परतले. होल्डरने 11 तर राहुलने 4 धावा केल्या. हैदराबादसाठी प्रुफल हिंगे आणि साकिब हुसैन या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर कॅप्टन पॅट कमिन्स याने 1 विकेट घेतली.

लाईव्ह स्कोअरकार्ड

गुजरात हैदराबादला रोखणार?

दरम्यान हैदराबादच्या टीममध्ये विस्फोटक आणि एकहाती सामन्याचा निकाल बदलणारे फलंदाज आहेत. अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, हेन्रिक क्लासेन आणि इशान किशन यासारखे 4 अनुभवी फलंदाज हैदराबादच्या गोटात आहेत. या चौघांनी आतापर्यंत झंझावाती खेळी करुन हैदराबादला विजयी केलं आहे. त्यामुळे आता गुजरातचे गोलंदाज या विस्फोटक फलंदाजांसमोर कशी बॉलिंग करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!