ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या… थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
रत्नागिरीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप खासदार नारायण राणे यांनी संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर जोरदार टीका केली. संजय राऊत यांच्यावर बोलताना राणे म्हणाले की, त्यांच्या प्रत्येक वक्तव्याची चौकशी झाली पाहिजे.
रत्नागिरीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेते नारायण राणे यांनी संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर जोरदार टीका केली. संजय राऊत यांच्यावर बोलताना राणे म्हणाले की, त्यांच्या प्रत्येक वक्तव्याची चौकशी झाली पाहिजे. ते सतत आक्षेपार्ह बोलतात आणि कदाचित आजारपणामुळे असे वक्तव्य करत असावेत, असा टोला त्यांनी लगावला.
अमित शहा यांच्याबाबत बोलताना संजय राऊत यांनी “कवच कुंडल” असा उल्लेख केल्यावरही राणेंनी पलटवार केला. “संजय राऊत स्वतः कोणाच्या कवच कुंडलाखाली आहेत हे त्यांनी आधी सांगावं,” असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे गटातील खासदारांबाबत बोलताना राणेंनी “ऑपरेशन यशस्वी झालं, 6 खासदार इकडून तिकडे गेले,” असा दावा केला. पुढे आमदारांचाही नंबर लागेल, असेही त्यांनी म्हटले. त्यांनी उरलेल्या तीन खासदारांना भाजपात घेणारही नाही असं सांगितलं…
अणुऊर्जा प्रकल्पावर बोलताना राणेंनी प्रकल्पाचे समर्थन केले. विरोध करणारे व्यावसायिक असल्याचा आरोप करत त्यांनी आंदोलन करणाऱ्यांवरही निशाणा साधला. “प्रकल्प झाला असता तर मोठी प्रगती झाली असती,” असेही राणे म्हणाले.
Published on: Jun 25, 2026 07:07 PM
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र

