AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO : PF खातेधारकांसाठी मोठी बातमी, 3 दिवस पीएफ क्लेम करता येणार नाही; वाचा तारीख

EPFO Update : EPFO ने आपल्या ऑनलाइन क्लेम प्रणालीच्या अपग्रेडेशनसाठी तीन दिवसांच्या नियोजित मेन्टेन्सची घोषणा केली आहे. या काळात सदस्यांना सेवा मिळणार नाही.

EPFO : PF खातेधारकांसाठी मोठी बातमी, 3 दिवस पीएफ क्लेम करता येणार नाही; वाचा तारीख
EPFO Maintenence DateImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 25, 2026 | 10:48 PM
Share

EPFO च्या कोट्यवधी खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. EPFO ने आपल्या ऑनलाइन क्लेम प्रणालीच्या अपग्रेडेशनसाठी तीन दिवसांच्या नियोजित मेन्टेन्सची घोषणा केली आहे. त्यामुळे 26 जून ते 28 जून 2026 या कालावधीत EPF क्लेम दाखल करणे आणि त्यांची प्रक्रिया यासंबंधित सेवा तात्पुरत्या बंद राहणार आहेत. EPFO च्या माहितीनुसार, सेवा अधिक दर्जेदार, जलद आणि प्रभावी करण्यासाठी तसेच सदस्यांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात संस्थेचा डेटाबेस एकत्रीकरण आणि सॉफ्टवेअर प्रणालीचे अपग्रेडेशन करण्यात येणार आहे.

या तारखांना क्लेम दाखल करता येणार नाही

EPFO ने दिलेल्या माहितीनुसार 26 जून 2026 रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 28 जून 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत पोर्टलवर नवीन क्लेम दाखल करता येणार नाहीत. तसेच क्लेम प्रक्रिया करण्याची सुविधाही या कालावधीत उपलब्ध राहणार नाही. याचा परिणाम आधीच क्लेम दाखल केलेल्या सदस्यांवरही होणार आहे. अशा प्रकरणांची प्रक्रिया अपग्रेडेशनचे काम पूर्ण झाल्यानंतरच सुरू होईल. EPFO ने स्पष्ट केले आहे की, 29 जून 2026 पासून सर्व सेवा पुन्हा नियमितपणे सुरू केल्या जातील.

UMANG अॅपवरील सेवाही प्रभावित राहणार

EPFO च्या सेवांचा वापर करणाऱ्या UMANG अॅप वापरकर्त्यांनाही काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते. अॅपवरील माहितीनुसार, EPFO संबंधित सेवा 2 जुलै 2026 पर्यंत नियोजित देखभालीमुळे प्रभावित राहू शकतात. UMANG अॅपद्वारे सदस्य PF शिल्लक तपासणे, क्लेम दाखल करणे, UAN संबंधित सेवा वापरणे, तक्रार नोंदवणे आणि जीवन प्रमाणपत्रासाठी अर्ज करणे ही कामे करतात, मात्र ही सेवाही प्रभावित राहणार आहे.

PF बॅलन्स कसा तपासायचा?

EPFO पोर्टल किंवा अॅपच्या सेवा तात्पुरत्या बंद असल्या तरी सदस्य मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF शिल्लक तपासू शकतात. यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास PF बॅलन्सची माहिती मिळू शकते. तसेच 7738299899 या क्रमांकावर EPFOHO UAN ENG असा SMS पाठवल्यास PF शिल्लक आणि अलीकडील योगदानाची माहिती मिळू शकते. मात्र, या सुविधांचा लाभ घेण्यासाठी UAN क्रमांक आधार, PAN आणि बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?