बीड हादरलं! घरातून उचलून नेत विवाहितेवर अत्याचार, रात्रभर चावडीवर बांधून ठेवलं; पतीचा आक्रोश

बीडमध्ये एक धाक्कादायक घटना घडली आहे. येथे एका विवाहित महिलेला रात्री उचलवून नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. अत्याचारानंतर या महिलेला चावडीवर बांधून टाकण्यात आले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

| Updated on: Mar 15, 2026 | 6:08 PM
1 / 6
बीड : पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात विवाहित तरुणीवर अत्याचार करून तिला चावडीवर बांधल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

बीड : पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात विवाहित तरुणीवर अत्याचार करून तिला चावडीवर बांधल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

2 / 6

हे कृत्य आरोपी एकटा हे करू शकत नाही. त्याला आणखी काही लोकांनी सहकार्य केलं आहे. त्यामुळे सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडितेच्या पतीने केली आहे.

3 / 6

बीडच्या पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पडीत विवाहित तरुणी ही अल्पवयीन आहे. तिला मध्यरात्री घरातून उचलून नेत तिच्यावर नदीपात्रात अत्याचार केला.

4 / 6

यानंतर गावातील चावडीत एका लोखंडी पोलला तिला बांधून टाकले. सकाळी गावकऱ्यांनी पिडीतेला बांधलेल्या अवस्थेत पाहिल्यावर तिचा व्हिडिओ काढला आणि तिला सोडवले. यानंतर पीडित तरुणीचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले.

5 / 6

याप्रकरणी आरोपी वैभव पटेकर याच्या विरोधात पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान पिडीतेच्या पतीने tv9 शी बोलताना संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.

6 / 6

पीडित तरुणीचे कुटुंबीय सध्या भीतीच्या छायेत आहेत. आरोपी हे कृत्य एकटा करू शकत नाही, असा दावा करून त्यांनी पोलिसांनी सखोल तपास करावा अशी मागणी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us