
बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली. त्यांनी बार्शीतील सासुरे गावात एका कला केंद्रात काम करणाऱ्या नर्तकीच्या घरासमोर स्वत:वर गोळी झाडली.

मागील काही दिवसांपासून नर्तकी पूजा गायकवाड आणि माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्यात प्रेमसंबंध सुरू होते. यादरम्यान गोविंद बर्गे यांनी अत्यंत महागड्या वस्तू पूजाला दिल्या.

यादरम्यानच्या काळात पूजाची नजर पडली ती म्हणजे गोविंद बर्गे यांच्या गेवराईतील माधवनगर भागातील आलिशान बंगल्यावर गोविंद बर्गे यांनी गेवराईत अत्यंत आलिशान बंगला बांधला ज्याची वास्तूशांती काही दिवसांपूर्वीच झाली होती.

सोन्याचे दागिने, डिझाईनर साड्या आणि आयफोननंतर गेवराईतील हा बंगला माझ्या नावावर कर म्हणून नर्तकीने हट्ट धरला. गोविंदच्या त्या गेवराईतील बंगल्यात त्याचे कुटुंबिय राहत होते.

हाच तो बंगला आहे, नर्तकी गोविंदला नावावर करत बोलत होती. मात्र, गोविंद तसे करत नसल्याने तिने गोविंदचा संपर्क बंद केला. हेच नाही तर त्याला हा बंगला नावावर नाही केला तर तुझ्याविरोधात बलात्काराची तक्रार करेल असे सांगत होती.