‘Chhaava’ च्या आधी या अभिनेत्यांना लकी मॅस्कॉट ठरल्या या हिरोईन, बॉक्स ऑफीसवर पैशांचा पाऊस

बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्री त्यांच्या सहकलाकारांसाठी लकी मॅस्कॉट ठरल्या आहेत. त्यांची एण्ट्री बॉक्स ऑफीसवर पैशांची बरसात होण्याची गॅरंटी ठरते. याचे ताजे उदाहरण म्हणजे विक्की कौशल यांचा चित्रपट 'छावा' ठरला आहे. छावाने ही जादू केली की विक्की कौशलचा कोणताही चित्रपट इतकी कमाई करु शकलेला नाही. चला तर पाहूयात अशा हिरोईन ज्या त्यांच्या को-स्टारसाठी बॉक्स ऑफिसवर लकी ठरल्या आहेत.

| Updated on: Mar 02, 2025 | 8:30 PM
1 / 6
असे म्हणतात की मेहनती बरोबरच नशीब देखील महत्वाचे असते. बॉलीवूडमध्ये ही गोष्ट खूपच सत्य ठरत आली आहे अनेक कलाकार येथे नशीब आजमावण्यासाठी येत असतात.काहींना तर सहायक अभिनेत्याचा रोलपर्यंत मर्यादित राहातात. अक्षय कुमार आणि विक्की कौशल यांचे वर्षातून अनेक चित्रपट रिलीज होतात. परंतू बॉक्स ऑफीसवर एखादाच चित्रपट अपेक्षेवर खरा ठरतो. चला तर अशा हिरोईन्स पाहूयात ज्यांच्यामुळे हिरोंचेही भाग्य उजळले. आणि तो चित्रपट त्यांच्या करीयर मधला सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला.

2 / 6
रश्मिका मंदाना - विक्की कौशल : विक्की कौशल याचा चित्रपट 'छावा' ने बॉक्स ऑफीसवर तहलका माजवला आहे. हा चित्रपट त्याच्या कारकीर्दीतील सर्वात मोठा आणि अविस्मरणीय चित्रपट ठरला आहे. विक्की कौशल याच्या प्रतिभेवर कोणताही संशय नसला तरी हा चित्रपट इतका कमर्शियल हीट ठरेल हे त्याच्या चाहत्यांनाही वाटले नसेल. रियल लाईफमध्ये कटरिना कैफ हिला विक्कीची 'लकी चार्म' म्हटले जाते. तर रिल्स लाईफमध्ये आता रश्मिका मंदाना हीने ही भूमिका निभावली आहे. साऊथमध्ये रश्मिका हीचे सर्व चित्रपट हीट झाले आहे.तिने नावावर एक फ्लॉप सिनेमा नाही. त्यामुळे विक्कीला रिल्स लाईफमध्ये तिला 'लकी चार्म'म्हटले जाते.

3 / 6
कियारा आडवाणी -सिद्धार्थ मल्होत्रा:  कियारा आडवाणी हिला देखील बॉलीवूडचा लकी चार्म म्हटले जाते. करण जौहर यांच्या मते ती धर्मा प्रोडक्शनसाठी खूपच लकी ठरली आहे. साल २०१४ ते २०१९ पर्यंत सिद्धार्थ मल्होत्रा याचे फ्लॉपवर फ्लॉप येत होते. त्याने 'इत्तेफाक', 'बार-बार देखो', 'अ जेंटलमेन' आणि 'मरजावां' सारखे चित्रपट केले. पण बॉक्स ऑफीसवर त्याचा काही प्रभाव पडला नाही. अखेर साल २०२१ मध्ये त्याचा 'शेरशाह' चित्रपट आला आणि त्याचे करियर रुळावर आले. या चित्रपटात कियारा आडवाणी ही त्याची लकी मॅस्कॉट ठरली.

4 / 6
आयशा टाकिया- सलमान खान : बॉलीवुडचा दबंग स्टार सलमान खान आज भलेही यशस्वी स्टार असला तरी त्याचा काळही वाईट सुरु होता. २००६ ते २००८ पर्यंत त्याने १३ चित्रपट केले. या चित्रपटांनी निराश केले. परंतू साल २००९ मध्ये सलमानने प्रभू देवाचा चित्रपट 'वॉन्टेड'चित्रपटात काम केले. त्यावेळी त्याच्या  अपोझिट आयशा टाकिया होती. आयशा ही त्याच्यासाठी लकी चार्म ठरली. आयशा हीचे बॉलीवूड करियर जरी लांबले नसले तरी 'वॉन्टेड' ने बॉक्स ऑफिसवर झेंडे रोवले. आणि सलमानचे करियर पुन्हा उंचावर नेले.

5 / 6
 अमीषा पटेल-सनी देओल : अमिषा पटेल हीला देखील  बॉलीवुडची 'लकी मॅस्कॉट'म्हटले जाते. ऋतिक रोशनचा अपोझिट तिने 'कहो न प्यार है'मधून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. अमिषा पटेल हीने बॉक्स ऑफीसवर सनी देओल याचे झोपलेले करियर पु्न्हा उभारी देत नवी संजीवनी दिली.  २००१ मध्ये  रिलीज झालेली फिल्म 'गदर: एक प्रेम कथा' या चित्रपटाने सनी देओलची सेंकड इनिंगच सुरु झाली. याआधी सनी देओलचे ओळीने 'अर्जुन पंडित' पासून ते चॅम्पियन, फर्ज, कहर आणि इसकी टोपी उसके सर असे चित्रपट आपटले होते. गदर एक प्रेम कथेने जो रेकॉर्ड बनविला ,त्यापेक्षा मोठा रेकॉर्ड सनीच्या साल २०२३ मध्ये आलेल्या गदर-२ ने बनविला.

6 / 6
 कियारा आडवाणी- शाहिद कपूर : कियारा आडवाणी  केवळ पती सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासाठीच लकी ठरली नाही तर तिने शाहिद कपूर याच्या करियरला देखील चार चांद लावले. संदीप रेड्डी वांगा याचा चित्रपट 'कबीर सिंह'मध्ये पहिल्यांदा मुख्य अभिनेत्री म्हणून काम करणाऱ्या  कियारा आडवाणी आणि शाहिद कपूर यांची जोडी सुपर हीट ठरत हा चित्रपट  शाहिदच्या करियरचा सर्वांत जास्त कमाई करणारा चित्रपट बनला.