IPL 2024 | आयपीएल गाजवणाऱ्या एका मोठ्या खेळाडूच सीजन सुरु होण्याआधी शुभमंगल सावधान
IPL 2024 | आयपीएलमध्ये काही खेळाडू विशेष लक्षात राहतात. प्रत्येक सीजन सुरु होण्याआधी त्यांच्या नावाची चर्चा असते. कारण एकहाती सामना फिरवण्याची क्षमता या खेळाडूंमध्ये असते. अशाच एका मोठ्या प्लेयरने सीजन सुरु होण्याआधी लग्न केलय.
David Miller Marriage
Image Credit source: instagram
-
-
IPL 2024 चा सीजन सुरु होण्याआधी दक्षिण आफ्रिकेचा एक मोठा खेळाडू विवाहाच्या बोहल्यावर चढला. मागचे दोन सीजन या प्लेयरने गाजवले आहेत.
-
-
दक्षिण आफ्रिकेचा डेविड मिलर विवाहबद्ध झालाय. आयपीएलमध्ये तो गुजरात टायटन्सच्या फ्रेंचायजीकडून खेळतो. कठीण प्रसंगातून टीमला बाहेर काढणं ही त्याची खासियत आहे.
-
-
22 मार्च 2024 पासून आयपीएलचा सीजन सुरु होतोय. त्याआधी डेविड मिलरने विवाह उरकून घेतलाय. यावर्षी सोबत त्याची पत्नी सुद्धा भारतात येऊ शकते.
-
-
डेविड मिलरने गर्लफ्रेंड कॅमिला हॅरिससोबत लग्न केलं. बऱ्याच काळापासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते. ऑगस्ट 2023 मध्ये त्यांचा साखरपुडा झाला.
-
-
दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लग्नाचे फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत. जोडा एकदम शोभून दिसतो. कॅमिला सुद्ध खूप सुंदर आहे.