Rajpal Yadav : राजपाल यादवच्या आधी सलमान खानने दोन वर्ष पाकिस्तानी तुरुंगात काढणाऱ्या या सुपरस्टारची सुद्धा केलीय मदत
Rajpal Yadav : आपल्या विनोदाने प्रेक्षकांना भरभरुन हसवणाऱ्या राजपाल यादवची वाईट वेळ सुरु आहे. तो तिहार तुरुंगात बंद आहे. 9 कोटी रुपये कर्ज प्रकरणात त्याला अटक झालीय. इंडस्ट्रीतून त्याच्या मदतीसाठी अनेक जण पुढे येत आहेत.

अनेकदा चित्रपट सृष्टीतले कलाकार कर्जामध्ये बुडून जातात. त्यामुळे त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागतं. सध्या असचं काहीस प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता राजपाल यादव सोबत झालय. एका चित्रपटाशी संबंधित तो 9 कोटी रुपये परत करु शकला नाही म्हणून तो तिहार तुरुंगात आहे.

आर्थिक कारणामुळे दिवाळखोर होणारा राजपाल यादव असा पहिला कलाकार नाहीय. त्याच्याआधी सुद्धा असा एक कलाकार होता, जो 2 वर्ष पाकिस्तानी तुरुंगात बंद होता. ज्यावेळी इंडस्ट्रीला समजलं ते आर्थिक संकटात आहेत, त्यावेळी सलमान खान, अमिताभ बच्चन सारखे सुपरस्टार त्यांच्या मदतीसाठी पुढे आले.

अवतार किशन हंगल सुद्धा अशाच कलाकारांपैकी एक आहेत. ते केवळ अभिनेते नव्हते तर स्वातंत्र्य सेनानी सुद्धा होते. 1 फेब्रुवारी 1914 रोजी पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये अवतार किशन हंगल यांचा जन्म झाला. ते काश्मिरी पंडित होते. त्यांचं बालपण पेशावरमध्ये गेलं.

1929 ते 1947 पर्यंत ते भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात सक्रीय होते. पार्टीशन नंतर ते पाकिस्तानातच राहिले. नंतर त्यांना कराचीमध्ये अटक झाली. 2 वर्ष ते तिथल्या तुरुंगात बंद होते. अखेर कठीण परिस्थितीचा सामना करत ते भारतात आले.

अवतार किशन हंगल हे भारतीय सिनेमात एके हंगल म्हणून ओळखले जातात. शोले चित्रपटातील त्यांची रहीम चाचाची भूमिका खूप गाजली. 2001 मध्ये त्यांचा शंभू काकाचा रोल खूप गाजला. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात त्यांच्याकडे पैसा नव्हता. 2011 मध्ये त्यांची प्रकृती बिघडली. तेव्हा फिल्म इंडस्ट्रीतून सलमान खान, अमिताभ बच्चन त्यांच्या मदतीसाठी पुढे आले. 2012 साली वयाच्या 98 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.