Trending Movie : नेटफ्लिक्सवर या 5 पाच चित्रपटांचा धुमाकूळ, तुफान ट्रेंडिंगवर!
सध्या नेटफ्लिक्सवर काही चित्रपट चांगलाच धुमाकूळ घालत आहेत. यातील पाच चित्रपट तर सगळीकडे चर्चचा विषय आहेत. या विकएंडला या चित्रपटांना विशेष पसंदी मिळत आहे.

कॉन सिटी : अर्जुन दास आणि अन्ना बेन यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 24 जुलै 2026 पासून Netflix वर उपलब्ध झाला. हरीश दुरैराज यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कर्नाटकातील मुल्की येथे हॉटेल चालवताना मध्यमवर्गीय कुटुंब असल्याचे भासवणाऱ्या एका अनोख्या ठगांच्या टोळीची कथा यात पाहायला मिळते. Netflix च्या ग्लोबल टॉप 10 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

गट्टा कुस्ती 2 : बॉक्स ऑफिसवरील यशानंतर हा स्पोर्ट्स ड्रामा-अॅक्शन-कॉमेडी चित्रपट आता Netflix वरही धुमाकूळ घालत आहे. स्ट्रीमिंग सुरू होताच चित्रपटाने पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. विष्णू विशाल आणि ऐश्वर्या लक्ष्मी प्रमुख भूमिकेत आहेत. हा 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या गट्टा कुस्तीचा अधिकृत सिक्वेल आहे.

पति पत्नी और वो 2 : आयुष्मान खुराना यांची ही कॉमेडी फिल्म नुकतीच Netflix वर दाखल झाली आहे. तीन महिलांच्या आयुष्यात अडकलेल्या एका पुरुषाची विनोदी कथा प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. OTT प्रेक्षकांकडून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून तो सहाव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.

पेड्डी : राम चरण स्टारर स्पोर्ट्स ड्रामा पेड्डी या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. जाह्नवी कपूर या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे. शिवा राजकुमार आणि दिव्येंदु यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

स्पायडर-मॅन: होमकमिंग : 2017 मध्ये प्रदर्शित झालेला Marvel चा लोकप्रिय सुपरहिरो चित्रपट पुन्हा एकदा Netflix वर चर्चेत आहे. टॉम हॉलंड अभिनीत हा चित्रपट आठव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.