7.1 रेटिंगचा सस्पेन्स थ्रिलर, थरकाप उडवणारा क्लायमॅक्स; नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंगमध्ये आला चित्रपट

ओटीटीवर तुम्हाला जर काही नवीन कंटेंट पहायचा असेल तर आम्ही तुम्हाला एक असा जबरदस्त चित्रपट सजेस्ट करतो, त्याची कथा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. या चित्रपटाचा क्लायमॅक्स तर मास्टरपीस आहे. जर तुम्ही हा चित्रपट बघायला सुरुवात केली, तर शेवटपर्यंत तुम्ही जागेवरून उठू शकणार नाही.

Updated on: Nov 17, 2025 | 10:51 AM
1 / 7
नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील एक चित्रपट सध्या चर्चेत आला आहे. या चित्रपटाची कथा अक्षरश: अंगाचा थरकाप उडवणारी आहे. काश्मीरच्या घाटातून अचानक लहान मुलं गायब होण्यापासून या चित्रपटाची सुरुवात होते. परंतु काही वेळानंतर त्यात हॉरर ट्विस्ट येतो. या चित्रपटाचं नाव आहे 'बारामुल्ला'.

2 / 7
'बारामुल्ला' हा एक सुपरनॅच्युरल मिस्ट्री थ्रिलर आहे, ज्याची कथा काश्मीरमधल्या बारामुल्ला याठिकाणी घडताना दाखवली आहे. डीएसपी रिदवान सय्यद शफीच्या भोवती त्याची कथा फिरते आणि यात रिदवानची भूमिका अभिनेता मानव कौलने साकारली आहे. तो अत्यंत प्रामाणिक आणि धाडसी पोलीस अधिकारी असतो.

3 / 7
बारामुल्लामधील लहान मुलं रहस्यमय पद्धतीने गायब होऊ लागतात. सर्वांत आधी बारामुल्लामधील एका माजी आमदाराचा मुलगा अचानक गायब होतो. त्यानंतर ही केस रिदवानकडे सोपवली जाते. इथूनच या चित्रपटाच्या कथेची सुरुवात होते.

4 / 7
काश्मीर घाटातल्या मुलांचं अपहरण करून त्यांचं ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवादी बनवण्याच्या मुद्द्यावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. नव्वदच्या दशकात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाचीही झलक यात पहायला मिळते. तपासाच्या सुरुवातीला रिदवानला वाटतं की हे एखाद्या दहशतवादी समूहाचं कृत्य असेल, परंतु जसजसा तो या केसच्या खोलात जाण्याचा प्रयत्न करतो, तसं वेगळंच गुपित उलगडत जातं.

5 / 7
रिदवान या प्रकरणाचा तपास करत असतानाच आणखी काही मुलं गायब होतात. आश्चर्याची बाब म्हणजे गायब झालेली सर्व मुलं एकाच शाळेची असतात. तर दुसरीकडे रिदवानच्या कुटुंबीयांना घरात चित्रविचित्र सावल्या दिसू लागतात, तर कधी भयानक आवाज ऐकू येतात.

6 / 7
केसच्या तपासादरम्यान डीएसपी रिदवानचीच मुलगी अचानक गायब होते आणि मग कथेत जबरदस्त वळण येतं. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्याची सुरुवात सस्पेन्स थ्रिलरने होते, परंतु काही वेळातच त्याचं हॉररमध्ये रुपांतर होतं. मानव कौलचा हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंगमध्ये आहे. देशातील टॉप 10 चित्रपटांच्या यादीत ही चौथ्या स्थानावर आहे.

7 / 7
'बारामुल्ला'चं दिग्दर्शन आदित्य जांभळेनं केलंय. नेटफ्लिक्सवर तुम्ही हा चित्रपट हिंदी भाषेत पाहू शकता. आयएमडीबीवर या चित्रपटाला 7.1 रेटिंग मिळाली आहे. या चित्रपटाचा क्लायमॅक्स अक्षरश: थरकाप उडवणारा आहे.