
केळी हे एक असे फळ आहे जे वर्षभर उपलब्ध असते. केळं हे उर्जेचा उत्तम स्रोत मानले जाते. परंतु, केळी कधी खावीत याचे शास्त्र शुद्ध पद्धतीने पालन केल्यास त्याचे शरीराला दुप्पट फायदे मिळतात.

सकाळी उठल्यावर केळी खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी ६ आणि पोटॅशियम रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, त्यांच्यासाठी सकाळी केळी खाणे अत्यंत गुणकारी ठरते.

जिमला जाण्यापूर्वी किंवा व्यायाम करण्यापूर्वी १-२ केळी खाणे सर्वोत्तम मानले जाते. केळीमधील कार्बोहायड्रेट्स वर्कआउटसाठी आवश्यक ऊर्जा पुरवतात. तसेच पोटॅशियम स्नायूंमधील क्रॅम्प्स (cramps) येण्यापासून रोखते. तसेच स्नायू मजबूत करते.

दुपारच्या जेवणानंतर केळी खाल्ल्याने पचनक्रिया अधिक गतिमान होते. केळीतील फायबर अन्नाचे पचन सुलभ करते. तसेच आतड्यांचे आरोग्य सुधारते. हे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासही मदत करते.

संध्याकाळी ४ ते ६ च्या दरम्यान जेव्हा छोटी भूक लागते, तेव्हा जंक फूड खाण्याऐवजी केळी खाणे हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे स्नॅक्सिंगची सवय सुटते. तसेच शरीराला आवश्यक पोषण मिळते.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)