
चुकीच्या पद्धतीने रोजची कामे करणे, दिनचर्या चुकीची असणे यामुळे आरोग्यावर खूप वाईट असे परिणाम पडतात. चुकीच्या आहारामुळे तर काही जणांच्या पोटावर खूप सारी चरबी जमा होते. त्यांचे पोट बाहेर येते. बहुसंख्य लोकांना आजघडीला ही अडचण आहेच.

पण या अडचणीवर तुम्हाला मात करता येऊ शकते. योग्य ती काळजी घेतली तर हे शक्य आहे. आयुर्वेदाच्या मदतीने हे शक्य होऊ शकते. हे उपाय केले तर कदाचित तुम्हाला लगेच फरकही जाणवू लागेल. तुमच्या पोटावरील चरबी कमी होऊ शकते.

आल्याचा रस आणि मधाच्या मदतीने तुम्ही पोटावरील चरबी कमी करू शकता. त्यासाठी तुम्हाला 30 मिली आल्याच्या रसामध्ये दोन चमचे मध मिसळून तो खायचा आहे. सकाळी सकाळी रिकाम्या पोटी असे केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. तसेच तुमच्या आरोग्यतही सुधारणा होते.

वजन कमी करायचे असेल तर दालचिनी मदतीला येऊ शकते. आचार्य श्री बालकृष्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार 200 मिली लीटर पाण्यात तीन ते चार ग्रॅम दालचीनी पावडर मिसळून ते 15 मिनिटांपर्यंत उकळावे नंतर हे मिश्रण कोमट झाल्यानंतर त्यात मध मिसळावा. सकाळी रिकाम्या पोटी हे सेवन केल्यास तुमच्या पोटावरील चरबी कमी होऊ शकते.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)