या अभिनेत्याने पटवलेली त्याची घर मालकीण, मोठ्या पडद्यावर वहिनी आणि शेजाऱ्यांशी करायाचा फ्लर्ट

बॉलिवूडमधील असा एक अभिनेता ज्याने आपल्या घर मालकिणीलाच पटवले होते. आजही हा अभिनेता मोठ्या पडद्यावर वहिनी आणि शेजाऱ्यांशी फ्लर्ट करतो.

| Updated on: May 27, 2026 | 12:53 PM
1 / 5
टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी मालिकांपैकी एक असलेल्या 'भाभी जी घर पर हैं' मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता आसिफ शेख हा त्याच्या अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. मालिकेत विभूती नारायण मिश्रा ही भूमिका साकारत तो शेजारच्या ‘भाभीजीं’सोबत फ्लर्ट करत होता. मात्र, खऱ्या आयुष्यात त्याची प्रेमकहाणी खूपच वेगळी आणि खास आहे.

2 / 5

आसिफ शेखला स्वतःच्या मकानमालकाच्या मुलीवरच प्रेम जडलं होतं. मुंबईत संघर्षाच्या काळात राहत असताना त्याची ओळख जेबा यांच्याशी झाली. हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढली आणि अनेक वर्षे त्यांचे प्रेमसंबंध सुरू होते. त्या काळात आसिफ शेखला अभिनय क्षेत्रात फारसं यश मिळत नव्हतं. मुख्य भूमिकांऐवजी त्याला खलनायकाच्या भूमिका मिळत होत्या आणि कामाचीही अडचण होती.

3 / 5

अशा कठीण परिस्थितीतही जेबाने आसिफ शेखची साथ सोडली नाही. अखेर 1989 मध्ये आसिफ शेखने जेबाच्या कुटुंबाकडे लग्नासाठी मागणी घातली. विशेष म्हणजे, त्याच्या सासूबाईंना आसिफ खूप आवडत होता. त्यामुळे दोघांच्या लग्नाला सहज संमती मिळाली आणि त्यानी लग्न केलं.

4 / 5

लग्नाच्या सुरुवातीच्या काळात आर्थिक परिस्थिती कठीण होती. मात्र, जेबाने प्रत्येक संकटात पतीची साथ दिली. आजही त्या ग्लॅमर आणि लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करते. बॉलिवूड पार्टी किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ती फारशी दिसत नाही.

5 / 5

लग्नानंतर आसिफ शेख आणि जेबा यांना दोन मुलं झाली. आता त्यांची मुलं मोठी झाली असली तरी आसिफ शेखकडे पाहून तो 61 वर्षांचा आहे यावर विश्वास बसत नाही. आजही तो आपल्या दमदार कॉमिक टायमिंगमुळे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us