PHOTO | भीषण आगीत भाताचं पीक जळून खाक; शेतकऱ्याला अडीच लाखाचा फटका

| Updated on: Dec 01, 2020 | 5:22 PM

वापे येथील शेतकरी नूतन पाटील यांनी भात शेती करुन पिकवलेल्या भात शेतीची कापणी करुन तब्बल 650 भाताचे भारे आपल्या शेतात रचून ठेवले होते.

1 / 6
भिवंडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात शेतीचे पीक घेतल जात असताना भाताच्या भाऱ्यांना आग लागून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. भिवंडी तालुक्यातील वापे येथे ही घटना घडली.

2 / 6
वापे येथील शेतकरी नूतन पाटील यांनी भात शेती करुन पिकवलेल्या भात शेतीची कापणी करुन तब्बल 650 भाताचे भारे आपल्या शेतात रचून ठेवले होते. त्याठिकाणी ही अचानक आग लागून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

3 / 6
सदर घटना तालुक्यातील वापे ग्रामपंचायत परिसरात गावाबाहेर असलेल्या शेतकऱ्याच्या शेतात घडली असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

4 / 6
दरम्यान, आग लागल्याचे समजल्यावर गावातील ग्रामस्थांनी ही आग विझविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. परंतु, तोपर्यंत सर्व भाताचे भारे जाळून खाक झाले होते.

5 / 6
या आगीमुळे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची महिती शेतकरी नूतन पाटील यांनी दिली आहे.

6 / 6
तालुक्यातील बहुतांशी शेतकरी वर्षातून एकच भाताच पीक घेऊन आपला उदर निर्वाह करत असतात. तसेच, यावर्षी अतिवृष्टी आणि कोरोना या दुहेरी संकटामुळे शेतकरी अगोदरपासून आर्थिक संकटात सापडला असताना वर्षभर मेहनत करुन हातातोंडाशी आलेलं पीक असं जळून खाक झालं असल्याने शेतकरी नूतन पाटील यांच्यावर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे.